करुणानिधींच्या अंत्यसंस्काराचा वाद, कार्यकर्त्यांकडून तोडफोड

करुणानिधी यांच्या दफनविधीवरुन तणावाचं वातावरण 

Updated: Aug 8, 2018, 09:18 AM IST
करुणानिधींच्या अंत्यसंस्काराचा वाद, कार्यकर्त्यांकडून तोडफोड title=

चेन्नई : तामिळनाडू सरकारनं डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांच्या दफनविधीसाठी मरिना बीचवरील जागा नाकारल्याने तणावाचं वातावरण आहे. सरकारच्या या निर्णयामुळे डीएमके कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. कावेरी रुग्णालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. व्यू वॉन्ट मरिना अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. सध्या स्थिती नियंत्रणात असली तरी तणावाचं वातावरण आहे. 

द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी रुग्णालयासमोर प्रचंड गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.