मुंबई : सोशल मीडीयावर (social media) एक फोटो व्हायरला होत आहे. फोटो पाहिल्यानंतर युजर्समध्ये हा एक भिकारी आहे का मॉडेल असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान बुधवारी एका युजर्सने ट्विटरवर फोटो शेअर केला आणि लिहिले की, दिल्लीवाले भिकारी.. हा फोटो पोस्ट होताच 17 हजारांहून अधिक लाईक्स आणि 1 हजारांहून अधिक री-ट्विट्स मिळाले. या व्हायरल फोटोला तर एकाने दक्षिण दिल्लीचा भिकारी असेल, असे ट्विट करत म्हटले आहे. तर दुसऱ्याने, गरीब आणि फकीरांचा कबीर सिंग आहे. इतकंच नाही तर काहींनी अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि हृतिक रोशनची झलक दिसते असे म्हटले आहे.
ट्विटमधील हा फोटो दिल्लीतील एका ट्रॅफिक सिग्नलसारखे दिसतं आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती क्रॅचच्या सहाय्याने चालत आहे. त्या माणसाला दाढी मिशा आहेत आणि त्याने स्वॅगचा काळा चष्मा घातला आहे. मात्र, हा माणूस सिग्नलवर भीक मागत होता की रस्ता ओलांडत होता याची अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र ट्विटर युजर्सने मात्र फोटोवर मॉडेल भिकारी असल्याचे म्हटले आहे.
मात्र ट्विटरवर फोटो व्हायरल झाल्यानंतर सोनू (@supermodel72) नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने रिट्विट केले आणि लिहिले की, 'बे भिखारी मॉडल हूं मैं', असे म्हटले आहे. सोनूच्या या ट्विटला 11 हजार लाइक्स आणि 1200 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. त्याचबरोबर सोनू नावाच्या ट्विटर पेज ला 134 लोक फॉलो करत आहेत. काही युजर्सने हे एक फेक प्रोफाइल असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी हे अकाऊंट फक्त उत्तर देण्यासाठी तयार केले असल्याचे म्हटले आहे.