Cooking Tips: घरीच कुकरमध्ये 8 मिनिंटात बनवा यम्मी choco lava cake

पदार्थांचं प्रमाण आणि वेळेचं गणित अगदी व्यवस्थित फॉलो केलं तर केकचा बेत मुळीच फसणार नाही.(Choco Lava Cake Recipe Without Oven)  

Updated: Dec 24, 2022, 11:40 AM IST
Cooking Tips: घरीच कुकरमध्ये 8 मिनिंटात बनवा यम्मी choco lava cake  title=

Choco lava cake in cooker: चोको लावा केक म्हटलं कि वाफाळता केक आणि तो कापल्यानांतर त्यातून लाव्हासारखा विटाळणारा  चॉकलेट अहाहा ! वाचूनच तोंडाला पाणी सुटलं ना ?  चोको लावा केक म्हटलं कि लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा विषय. त्यात आता ख्रिसमस (Christma special) आहे,  त्यासाठी केक आलाच पण अश्या वेळी बाहेरून केक ऑर्डर करणं म्हणजे एकत्र महागडे विकले जातात तर दुसरीकडे त्यात वापरले जाणारे पदार्थ काय असतील याचा अंदाज नसतो . आणि त्यात सध्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरवात केली आहे, (corona increses in india) त्यामुळे बाहेर पडणं आलं बाहेरच खाण आलं या सर्वाला आला घालायला हवा, नियमांचं पालन करावं लागणार, (covid 19 spreading follow this rules india 2022) मग अश्यावेळी घरच्या घरी केक बनवून तुम्ही सणांची मजा वाढवू शकता. (homemade cake recipe)

चोको लाव्हा केक दिसायला फार अवघड वाटत असला तरी बनवायला अगदी सोपा आहे , आणि मुख्य म्हणजे तुम्ही तो ओव्हनशिवाय कूकरमध्ये बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया चोको लाव्हा केक बनवण्याची सोपी आणि झटपट पद्धत. (choco lava cake in pressure cooker easy quick recipe) 

 पदार्थांचं प्रमाण आणि वेळेचं गणित अगदी व्यवस्थित फॉलो केलं तर केकचा बेत मुळीच फसणार नाही.(Choco Lava Cake Recipe Without Oven)

साहित्य 

  • 2 चमचे बटर (रूम टेम्परेचरवर सेट केलेलं )
  • कोको पावडर - 2 चमचे 
  • मैदा  - अर्धा कप 
  • पिठी साखर - अर्धा कप 
  • दूध - पाव कप 
  • डेअरी मिल्क चॉकलेट 
  • बेकिंग पावडर - अर्धा टीस्पून 

कृती

चोको लाव्हा केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी ऍल्युमिनिअम फॉईल घेऊन केक मोल्ड तयार करून घ्या त्या पूर्ण मोल्ड ला बटर लावून ग्रीस करून घ्या. 

हे करत असताना गॅसवर प्रेशर कुकर ठेऊन त्याला तापवायला सुरु करा, त्यात अर्धा वाटी मीठ घाला आणि ते व्यवस्थित पसरवून घ्या. कुकरमध्ये उंच स्टॅन्ड किंवा वाटी ठेवा आणि त्यावर एक प्लेट ठेऊन द्या.

या प्लेटवर केक मोल्ड जो आपण आधीच बनवून घेतलाय तो ठेवणार आहोत. आता कुकरची शिट्टी आणि वायर काढून घ्या आणि कुकरला झाकण लावून टाका, १० मिनिटांसाठी उगारला प्री-हिट होऊद्या.

 तोपर्यंत एका दुसऱ्या बाऊलमध्ये मैदा कोकोपावडर पिठी साखर आणि बेकिंग पावडर गाळून चाळणीच्या मदतीने चाळून घ्या , मग यात दूध घाला आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.

 (video credit: The Terrace Kitchen youtube )

डेअरिमिल्क कॅडबरी डबल बोईलिंग पद्धतीने वितळून घ्या आणि त्यात बटर घाला आणि हे मिश्रण केकसाठी तयार केलेल्या बॅटरमध्ये मिक्स करा. 

आता हे मिश्रण केक मोल्डमध्ये घाला आणि प्रीहिटसाठी ठेवलेल्या कुकरमध्ये ८-१२ मिनिटं बेक करायला ठेऊन द्या.  एक लक्षात ठेवा यावेळी गॅस मध्यम असायला हवा. 

गरमागरम खायला टेस्टी असा चोको लाव्हा बनून तयार.