कोरोनाची लस तीन महिन्यांत येणार; केंद्रीय आयुष मंत्र्यांचा दावा

आता केवळ अंतिम टप्प्यातील गोष्टी बाकी असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. 

Updated: Jul 5, 2020, 02:47 PM IST
कोरोनाची लस तीन महिन्यांत येणार; केंद्रीय आयुष मंत्र्यांचा दावा

नवी दिल्ली: भारतात कोरोनवरील लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सहा ते सात आठवड्यांमध्ये या प्रयत्नांना यश येईल, असा दावा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केला. ते रविवारी 'झी न्यूज'च्या  इंडिया इम्युनिटी E-CONCLAVE मध्ये बोलत होते. 

धोका वाढला; भारतात एका दिवसात २४८५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद

काही दिवसांपूर्वी भारतीय वैदयक संशोधन परिषदेने (ICMR) १५ ऑगस्टपर्यंत कोरोनवारील देशी लस विकसित होईल, असा अंदाज वर्तवाला होता. भारतातील दोन कंपन्यांनी विकसित केलेल्या कोरोना लसींच्या मानवी परीक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. ७ जुलैनंतर या प्रक्रियेला सुरुवात होईल. मात्र, इतक्या जलदगतीने परीक्षण करून लसीचा वापर करण्याबाबत भारतीय तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. 

कोरोना लसीच्या उत्पादनावरून होणाऱ्या वादांवर ICMR चा मोठा खुलासा

या पार्श्वभूमीवर श्रीपाद नाईक यांनी केलेला खुलासा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. श्रीपाद नाईक यांनी म्हटले की, सध्या भारतात कोरोनाच्या चार-पाच लसींवर काम सुरु आहे. या लसींचे परीक्षण वेगवेगळ्या टप्प्यात आहे. आम्हाला याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आयुष मंत्रालाकडून ती तपासण्यात आली. त्यानुसार तीन महिन्यांत कोरोनावरील लस विकसित होईल, असा अंदाज आहे. त्यापैकी एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. आता केवळ अंतिम टप्प्यातील गोष्टी बाकी असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. याशिवाय, आयुष मंत्रालयाकडून काढा तयार करणाऱ्या कंपन्यांनाही उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात आल्याचेही नाईक यांनी सांगितले.