तोंडावर मास्क नसलेल्यांना 'या' सुविधा देऊ नका, शासनाचे कठोर पाऊलं

कोरोनाशी दोन हात करताना अनेक राज्यांनी आपले नियम अधिक कठोर केले

Updated: May 20, 2020, 07:24 AM IST
तोंडावर मास्क नसलेल्यांना 'या' सुविधा देऊ नका, शासनाचे कठोर पाऊलं title=

नवी दिल्ली : लॉकडाऊन ४ हे ३१ मेपर्यंत सुरु राहणार आहे. कोरोनाशी दोन हात करताना अनेक राज्यांनी आपले नियम अधिक कठोर केले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने नुकताच एक निर्देश जाहीर केलाय. ज्यामध्ये नागरिकांना काही सवलत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर गाड्यांची येजा वाढणार आहे. यावर पोलीस आयुक्त सुजीत पांडे यांनी एक शक्कल लढवली आहे. 

राज्यामध्ये २१ मे पासून 'नो मास्क नो पेट्रोल' हा फॉर्मुला चालवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ज्या ड्रायव्हरच्या तोंडावर मास्क नसेल त्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही.

हे आहेत निर्देश 

तोंडावर मास्क नसलेला कोणताही व्यक्ती घराबाहेर पडला अथवा रस्त्यावर दिसला तर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. 

एका बाईकवर दोन व्यक्ती जाऊ शकणार नाहीत. महिला, आजारी किंवा ज्येष्ठ नागरिकांना यातून सूट दिली जाईल. दोन व्यक्ती बाईकवर आढळल्यास त्यांचे वाहन जप्त होईल तसेच एफआयआर नोंद होईल. 

तोंडावर मास्क नसलेल्या व्यक्तीला कोणत्याही स्थितीत दुकानातून सामान मिळणार नाही. चारचाकी वाहनामध्ये ३ प्रवासी प्रवास करु शकणार नाहीत. विनाकारण कोणी घराबाहेर पडू नका. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद होईल. आवश्यक ती कारवाई देखील होईल. 

Lockdown 4.0: वाचा राज्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?

लॉकडाऊन ४ मध्ये रात्रीची संचारबंदी 

संध्याकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सेवा बंद राहणार आहेत. 

-अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत बाहेर पडायला मज्जाव असेल. 

-६५ वर्षांवरील वृद्ध, गरोदर महिला, इतर आजार असलेल्या व्यक्ती, १० वर्षांखालील मुलं यांनी घरीच थांबावं, वैद्यकीय कारणासाठीच त्यांना घराबाहेर पडण्याची मुभा.

रेड झोन आणि बिगर रेड झोन विभागणी

- रेड झोनमध्ये मुंबई आणि एमएमआरमधील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिका. 

- उरलेली सर्व क्षेत्र बिगर किंवा नॉन रेड झोन क्षेत्र म्हणून घोषित.