Corona Vaccination: देशात ऑगस्ट महिन्यात सुरु होणार स्पूटनिक V चे उत्पादन, कोरोनाविरुद्ध जोरदार लढाईची तयारी

कोरोनाविरोधात (Coronavirus) आता तीव्र लढा सुरु करण्यात आला आहे.  

Updated: May 22, 2021, 11:13 AM IST
Corona Vaccination: देशात ऑगस्ट महिन्यात सुरु होणार स्पूटनिक V चे उत्पादन, कोरोनाविरुद्ध जोरदार लढाईची तयारी title=

मुंबई : कोरोनाविरोधात (Coronavirus) आता तीव्र लढा सुरु करण्यात आला आहे. कोरोनापासूनचा धोका टाळायचा असेल तर कोरोना लसीकरणावर (Corona Vaccination) भर दिला पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही  (WHO) म्हटले आहे. आता कोरोनाविरुद्ध भारताला आणखी एक मोठे शस्त्र मिळणार आहे. यावर्षी ऑगस्टपासून भारतात रशियाच्या स्पूटनिक व्हीचे (Sputnik V) उत्पादन सुरु होईल. रशियामधील भारताचे राजदूत डीबी वेंकटेश वर्मा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्पूटनिक व्हीच्या 850 दशलक्ष डोस सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत भारतात तयार केले जातील.

ऑगस्टपासून उत्पादन सुरु होईल

डीबी वेंकटेश वर्मा म्हणाले की, जगातील 65 ते 70 टक्के स्पूटनिक व्ही भारतात तयार होईल. (Production will start from August) त्याचबरोबर भारताच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर रशिया अन्य देशांमध्ये निर्यात करेल. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व्यतिरिक्त, 'स्पूटनिक व्ही' ही भारतात कोरोनाविरोधातील तिसरी लस आहे. जी भारतात लसीकरणाच्या वापरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.  'स्पूटनिक व्ही'मुळे काही देशात कोरोना नियंत्रणात आला आहे. त्याचबरोबर भारतातील काळ्या बुरशीच्या उपचाराबाबत भारत रशियाच्या संपर्कात आहे, जेणेकरुन या आजाराच्या उपचारांसाठी औषधे मागविली जाऊ शकतात.

जूनपर्यंत 50 ला डोस  

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF), रशियाचा सॉवरन वेल्थ  फंड या लसीला निधी पुरवतो. विशेष बाब म्हणजे त्यांनी आपल्या उत्पादनासाठी भारताच्या 5 पाच कंपन्यांशी करार केला आहे. भारताला आतापर्यंत स्पूटनिक व्हीचे 2,10,000 डोस प्राप्त झाले आहेत. मेच्या अखेरीस भारतात 3 दशलक्ष बल्क डोस दिले जाऊ शकतात. त्याचबरोबर ही संख्या जूनपर्यंत 50 लाख डोसपर्यंत वाढेल. (India will get 50 lakh doses by June) रशियाने देखील जाहीर केले आहे की, लवकरच एक डोसेड स्पुटनिक लाईटही भारतात उपलब्ध होईल.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x