Corona Update : चीनसह (China) काही देशांमध्ये कोरोनाने (Corona) पुन्हा डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये तर कोरोनाचा उद्रेक (Coronavirus outbreak ) झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. (Coronavirus) रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्यामुळे मोठा ताण पडला आहे. औषधांच्या तुटवड्यासह डॉक्टर्स आणि नर्स यांचाही तुटवडा जाणवत आहे. चीनच्या लोकांना तापावरच्या गोळ्याही मिळत नसल्याने रुग्ण आणि नागरिक हैराण झालेत.
केंद्र सरकारचं कठोर पाऊल
या पार्श्वभूमीवर भारत सरकराने (Central Government) पहिलं कठोर पाऊल उचललं आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची एअरपोर्टवर (Airport) RTPCR केली जाणार आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, बँकॉकमधून येणाऱ्या नागरिकांची RTPCR केली जाणार आहे. या टेस्टमध्ये कुणी पॉझिटीव्ह (Positive) आढळलं, तर त्यांना क्वारंटाईनही (Quarantine) केलं जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Dr Mansukh Mandaviya) यांनी ही माहिती दिलीय. तर ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी आरोग्य सचिवांनी सगळ्या राज्यांना पत्र लिहिलंय. त्याचबरोबर व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन मशीन्स व्यवस्थित आहेत ना, याकडेही राज्यांनी लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्यात.
मुंबई विमानतळावर नियमांची अंमलबजावणी
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांना पोस्ट अरायव्हल चाचणी करावी लागणार आहे. अएरलाईन्सच्या माहितीच्या आधारे अशा प्रवाशांची विमानतळावरच चाचणी केली जाणार आहे.
देशात कोरोनाचे किती रुग्ण?
देशात सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. गेल्या चोवीस तासात 201 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सघ्या 3,397 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाखांच्या पार गेली आहे. दरम्यान चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ओमायक्रॉनच्या BF.7 या सब व्हेरिएंटचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यादृष्टीने केंद्र सरकारने मार्गदर्शक सूनचा जारी केल्या आहेत.
चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक
चीनमध्ये कोरोनाची अत्यंत भयानक वाढ होत आहे. एकाच दिवसात तब्बल 3 कोटी 70 लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. चीनच्या आरोग्य प्राधिकरणाने हा दावा केला आहे. तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जवळपास 18% लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
|
NZ
(20 ov) 175/7
|
VS |
SA
178/3(17.1 ov)
|
| South Africa beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 187/5
|
VS |
BRN
191/5(20 ov)
|
| Bahrain beat Qatar by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SCO
(19.4 ov) 152
|
VS |
ENG
155/5(18.2 ov)
|
| England beat Scotland by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.