नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने वेग पकडला आहे. दिल्लीत सोमवारी कोरोनाचे २५ नवे रुग्ण आढळून आलेत. दरम्यान, २०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे येत याहे. त्यामुळे दिल्ली हादरली आहे. ही गंभीर परिस्थीती ओळखून दिल्ली सरकारनं जवाहरलाल नेहरु स्टेडियलमला क्वारंटाईन सेंटर बनवण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली लगतच्या नोएडातही कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून नोएडातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३७वर गेली आहे. दरम्यान, कोरोनाव्हायरस व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील निझामुद्दीनच्या मरकझ इमारतीत वैद्यकीय पथक आणि पोलिस उपस्थित आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला सुमारे २५०० लोक एका कार्यक्रमात उपस्थित होते. आतापर्यंत सुमारे ८६० लोकांना इमारतीतून रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे, सुमारे ३०० लोकांना हलविण्यात आले आहे..
Delhi: Sanitisation being done at NDMC Veterinary Hospital in Moti Bagh. A veterinary doctor at the hospital says, "We are getting only 20-25 cases in OPD these days as compared to around 200 cases on normal days." #CoronavirusLockdown pic.twitter.com/p80aP4SphG
— ANI (@ANI) March 31, 2020
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नर्सरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील इयत्तेत प्रमोट करण्यात येणारे. दिल्ली सरकारनं हा निर्णय घेतला आहे. तर १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी रोज ऑनलाईन वर्ग भरवण्यात येणारे. यासाठी डेटा पॅकसाठी येणारा खर्चही दिल्ली सरकारकडून देण्यात येणारे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी याबाबत घोषणा केली आहे.
Delhi CM Arvind Kejriwal and Lieutenant Governor Anil Baijal are holding a meeting via video conferencing over Nizamuddin Markaz issue. Deputy CM Manish Sisodia, Health Minister Satyender Jain and other officials are participating in the meeting. (file pic) #Coronavirus pic.twitter.com/Hu9vMaSsBs
— ANI (@ANI) March 31, 2020
Delhi: Medical team and Police are present at the Markaz building, Nizamuddin where around 2500 people had attended a function earlier this month. Around 860 people have been shifted from the building to hospitals so far, around 300 are yet to be shifted. #Coronavirus pic.twitter.com/tabosvqhQh
— ANI (@ANI) March 31, 2020
दिल्ली, नोएडा, हरियाणा आणि उत्तराखंड सह विविध राज्यांतून आलेल्या गरीब मजुरांवर उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये अघोरी प्रकार करण्यात आला आहे. बरेलीमध्ये परतलेल्या या मजुरांना बसस्टॉपवर बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अंगावर केमिकलची फवारणी करण्यात आली. त्यामुळे या मजुरांचे आणि त्यांच्या मुलांचे डोळे झोंबायला लागले.. आनन फानन सारख्या जागी सगळ्याच ठिकाणी अशा प्रकाररे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हाइपोक्लोराडीचा वापर करण्यात आला होता. त्यामुळो या मजुरांचे डोळे चुरचुरु लागले. परदेशांतून आलेल्या नागरिकांची तपासणी होते त्यानंतर त्यांचं विलगीकरण करण्यात येतं मात्र या गरिबांवर असा थेट केमिकलचा वापर केल्यामुळे यावर टीका होती होततती.
उत्तर प्रदेशातील बरेली शहराच्या सीमेवर परराज्यातून येणाऱ्या कामगारांना सॅनिटायझर सोल्युशनने अंघोळ घालण्यात आली. या घटनेची काँग्रेसच्या उत्तर प्रदेश महासचिव प्रियंका गांधी यांनी निंदा केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
हरियाणातील एकाला सॅनिटाझरचा वापर महागात पडला. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी एक जण घरात किचनमधील वस्तू सॅनिटाझरनं निर्जंतुक करत होता. त्याचवेळी शेजारी गॅस सुरु असल्यामुळे सॅनिटाझरनं पेट घेतला. यात हा व्यक्ती ३५ टक्के भाजला आहे. सध्या या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. हरियाणाच्या रेवाडी इथं ही घटना घडलीय.