१६ मे नंतर भारतात कोरोनाचा नवा रुग्ण नाही; नीती आयोगाच्या सदस्याचा दावा

३ मे नंतर भारतात कोरोना प्रादुर्भावाचा उच्चांक (पिक) पाहायला मिळेल. 

Updated: Apr 27, 2020, 09:30 AM IST
१६ मे नंतर भारतात कोरोनाचा नवा रुग्ण नाही; नीती आयोगाच्या सदस्याचा दावा title=

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांमध्ये देशातील कोरोना (Coroanvirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी १६ मे नंतर भारतात कोरोनाचे नवे रुग्ण आढळणार नाहीत, असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी केला आहे. 'द हिंदू' दैनिकाने यासंदर्भातीळ वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार,  व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी एक अहवाल सादर केला होता. यामध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रसारचा वेग मंदावला आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा (डबलिंग रेट) कालावधीही १० दिवसांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असली तरी १६ मे नंतर भारतात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळणार नाही, असे व्ही.के. पॉल यांनी म्हटले आहे. 

३ मेपर्यंत भारतात कोरोना व्हायरसचा पीक पॉईंट येईल का?; ICMR म्हणते...

३ मे नंतर भारतात कोरोना प्रादुर्भावाचा उच्चांक (पिक) पाहायला मिळेल. सध्या भारतात दिवसाला कोरोनाचे साधारण १५०० नवे रुग्ण मिळत आहेत. ३ मे नंतर हे प्रमाण काहीसे वाढेल. मात्र, १२ मेपर्यंत हा आकडा पुन्हा १००० पर्यंत खाली येईल. तर १६ मेपर्यंत हे प्रमाण शुन्यापर्यंत खाली येईल. याचा हिशोब करायचा झाल्यास २५ एप्रिल ते १५ मे या काळात देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत साधारण ३५ हजारांची भर पडेल. 

मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईत कोरोनाचे ७० हजार रुग्ण?

मात्र, याच समितीमधील एका तज्ज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर व्ही.के.पॉल यांचा दावा फेटाळून लावला आहे. गुजरात, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र यासारख्या करोनाचे 'हॉटस्पॉट' ठरलेल्या राज्यांमधील रुग्णसंख्या जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय सरासरी कमी होणार नाही, हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी होईल, याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे व्ही.के. पॉल यांनी कशाच्या आधारावर हा दावा केला, हे मला माहिती नाही. सध्याच्या आम्ही कोरोना आणखी दीर्घकाळ राहील ही शक्यता गृहीत धरून अधिकाधिक आयसीयू, व्हेंटिलेटर आणि आदी साहित्याची तरतूद करत आहोत, असे या सदस्याने सांगितले.