नवी दिल्ली : कोरोना वायरसवर (Corona virus) प्रभावी लस दृष्टीक्षेपात आल्याचे दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात संकेत दिले आहेत. याप्रकरणी वेळोवेळी नवनव्या बातम्या येत असतात. दरम्यान कोरोना व्हायरस नाकावाटे डोक्यापर्यंत (Enter into brain by nose) पोहोचतो असा दावा एका सर्व्हेत म्हटलं गेलंय. कोरोना प्रादुर्भावादरम्यान रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल (Neurological) का दिसतात आणि त्यातून कसं बाहेर पडायचं हे या अभ्यासातून समजणं शक्य आहे.
नेचर न्यूरोसायन्स (COVID-19 new study in Nature Neuroscience) मॅग्झिनमध्ये हा स्टडी छापण्यात आलायं. सार्स-सीओवी-2 (SARS-COV-2) केवळ श्वसन यंत्रणेवर परिणाम करते असे नाही तर सेंट्रल नर्वस सिस्टिमवर देखील प्रभाव टाकत असल्याचे या सर्व्हेत म्हटलंय.या प्रभावामुळे गंध जाणे. चव ओळखण्याची शक्ती कमी होणं, डोकं दुखणं, दम लागणं आणि चक्कर अशी न्यूरोलॉजिकल लक्षणं दिसतायत.
नव्या स्टडीनुसार, ‘आरएनए’ आणि ‘सेरेब्रोस्पाइनल फ्लूइड’ (Cerebrospinal fluid)वायरल डोक्यात असतात. वायरस कुठून प्रवेश करतो आणि कसा पसरतो ? हे अद्याप स्पष्ट नाही. जर्मनीच्या चारीटे विद्यापीठाच्या (Charite Universitatsmedizin Berlin) संशोधकांनी श्वसन नळीचे परीक्षण केलं.
या स्टडीमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पावलेल्या ३३ रुग्णांचा समावेश होता. यामध्ये ११ महिला आणि २२ पुरुष होते. मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ७१.६ वर्ष ही वयाची सरासरी होती. तर कोरोना प्रादुर्भाव झाल्यापासून मृत्यूपर्यंतची सरासरी वेळ ३१ दिवसांची असल्याचे यात म्हटलंय. डोकं आणि श्वसन नलिकेत सार्स-सीओवी-2 आरएनए (वायरसचे जेनेटिक मेटेरियल) आणि प्रोटीन सापडल्याचे संशोधकांनी सांगितले.