गाईसमोर घाणेरडा डान्स करणाऱ्या महिलेला गाईने शिंगावर घेतलं आणि टाकलं....'

सोशल मीडियावरती नेहमीच काही ना काही फोटो किंवा व्हीडिओ व्हायरल होत असतात. 

Updated: Jun 13, 2021, 03:50 PM IST
गाईसमोर घाणेरडा डान्स करणाऱ्या महिलेला गाईने शिंगावर घेतलं आणि टाकलं....'

मुंबई : सोशल मीडियावरती नेहमीच काही ना काही फोटो किंवा व्हीडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही डान्स चे व्हीडिओ असतात तर काहींची अ‍ॅक्टींग चे. हे व्हायरल झालेले व्हीडिओ कधी खरचं दाद देण्यासारखे असतात. तर काही लोकांना हसवणारे असतात. तर काही इतके बकवास व्हीडिओ असतात की, कधी कधी आपण विचार करतो की, ही अशी लोकं येतात तरी कुठून?  पणा अशा व्हाडिओ किंवा डान्सला आपण इग्नोर केल्या शिवाय काहीच करु शकत नाही.

तुमच्याकडे पर्याय असो वा नसो या गाईकडे पर्याय होत आणि तिने याचा फायदा नक्की उचलला.  एक महिला गाई समोर अश्लिल आणि घानेरडा डान्स करत होती. हे पाहून गाईने तिला अशी काय रिअ‍ॅक्शन दिली की, ती महिला आयुष्यात कधीही असा डान्स परत करणार नाही.

या महिलेचा अश्लिल डान्स पाहून गाईने सरळ तिला अशी धडक दिली की, ती महिला वर हवेत उडून खाली पडली.

हा व्हीडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, लोकं त्या महिलेचा डान्स नाही पण गाईने जी काही रिअ‍ॅक्श पाहूण खूप हसत आहेत आणि या व्हीडिओला शेअर करत आहेत.