अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.
कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या १९ जिल्ह्यांत ८९ जागांसाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात २ कोटी १२ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ९७७ उमेदवारांचं भवितव्य आज मतदानयंत्रात बंद होणार आहे.
भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला. सकाळीच त्याने मतदान केलं. राजकोटमधल्या रवि विद्यालय मतदान केंद्रावर त्याने मतदान केलं.
Cricketer Cheteshwar Pujara casts his vote in Rajkot's Ravi Vidayalaya booth. #GujaratElection2017 pic.twitter.com/NobynWfp6P
— ANI (@ANI) December 9, 2017
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान होतंय. पहिल्या टप्प्यात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रुपानी यांनी काही वेळापूर्वी मतदानाचा हक्क बजावलं आहे. मतदानाला सुरुवात होण्याआधी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंदिरात पूजा अर्चा केली. यानंतर रुपानी यांनी जनतेला मतदान करुन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, काँग्रेसचे शक्तिसिंग गोहिल, परेश धनानी या दोन्ही पक्षांमधल्या मोठ्या नेत्यांच्या भवितव्याचा फैसलाही आजच निश्चित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.