उधारी दिली नाही म्हणून रस्त्यावर पळवून पळवून मारलं, हत्येचा Live Video

अंगाचा थरकाप उडवणारा Video, सीसीटीव्हीत कैद झाला हत्येचा थरार

Updated: Sep 19, 2022, 07:09 PM IST
उधारी दिली नाही म्हणून रस्त्यावर पळवून पळवून मारलं, हत्येचा Live Video title=

Crime News : क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना CCTVत कैद झाली आहे. माणसांची आणि वाहनांची रहदारी असलेल्या रस्त्यावर हत्या केल्यानंतर आरोपी आरामात तिथून निघून जाताना या व्हिडिओत दिसत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कर्नाटकमधली असून कलबुर्गी इथे राहणारा जमीर नावाच्या युवकाने एका ओळखीच्या समीर नावाच्या व्यक्तीकडून 9 हजार उधार घेतले होते. समीरने पैसे परत मागितल्यावर जमीरने ते देण्यास असमर्थता दर्शवली. अनेक कारण देत जमीर पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होता. 

घटनेच्या आदल्या दिवशी याच कारणावरुन समीर आणि जमीरमध्ये वाद झाला. त्यानंतर शनिवारी जमीर जेवरगी रोडवरुन जात असताना समीर आणि त्याचा मित्र आकाश या दोघांनी जमीरवर जीवघेणा हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरत जमीर रस्त्यावरुन धावू लागला. पण समीर आणि आकाशने त्याचा पाठलाग करत त्याला पकडलं. यानंतर जमीरवर दोघांनी धारदार शस्त्राने अनेक वार केले. या हल्ल्यात जमीरचा जागीच मृत्यू झाला. 

हल्ला होत असताना त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली, पण एकानेही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. हत्या केल्यानंतर समीर आणि आकाश हातात हत्यार घेत आरामात तिथून निघून गेले. हत्येची पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.