Crime News: उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षिकेला चार तासांपर्यंत डिजिटल अरेस्ट ठेवण्यात आलं होतं. आरोपीने पोलिसांची वर्दी परिधान करत महिलेला व्हॉट्सअॅप कॉल केला. त्यानंतर त्याने असं काही सांगितले की महिलेचा जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महिलेला आरोपीने व्हॉट्सअॅप कॉल केला. त्यानंतर तुमच्या मुलीला सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आलं असून तिला सोडवायचं असेल तर 15 मिनिटांत 1 लाख रुपये पाठवा. अन्यथा तिचा व्हिडिओ व्हायरल करण्यात येईल, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने मुलीचा आवाजही महिलेला ऐकवला. त्यात ती आई मला वाचव, अशी एक व्हॉइस नोटदेखील ऐकवली. आरोपीची धमकी ऐकून शिक्षकेला मोठा धक्का बसला त्यातच तिला हृदयविकाराचा झटका बसला.
कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे तपासणीनंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मालती वर्मा असं या शिक्षिकेचे नाव असून तिचे वय 58 वर्षे आहे. महिला एका सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. तसंच, या घटनेने कुटुंबीयांमध्ये तणावपूर्व वातावरण होते. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर रोजी दुपारी जवळपास 12 वाजता त्यांना व्हॉट्सअॅप कॉल आला. डीपीवर पोलिसांच्या वर्दीतील एका व्यक्तीचा फोटो होतो. फोन उचलताच आरोपीने महिलेला म्हटलं की, तुमची मुलगी सेक्स सँडलमध्ये पकडली गेली आहे. जर तिला वाचवायचं असेल तर मी जसं सांगतो तसं करा, आरोपीची धमकी ऐकून महिलेला जबरदस्त धक्का बसला.
महिलेच्या मुलाने सांगितल्यानुसार, आईने त्याला फोनवरुन सगळी घटना सांगितली. आरोपीने महिलेकडे एक लाख रुपये मागितले होते. तसंच, फोनचा कोड +92 पासून सुरू होत होता. जो पाकिस्तानचा आहे. या प्रकरणी एसीपी मयंत तिवारी यांनी म्हटलं की, 30 सप्टेंबर रोजी महिलेचा मृत्यू झाला आणि गुरुवारी याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी गांभीर्याने चौकशी केली जात आहे. त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
ENG
(19.4 ov) 152
|
VS |
SCO
155/5(18.2 ov)
|
| England beat Scotland by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SCO
(19.4 ov) 152
|
VS |
ENG
155/5(18.2 ov)
|
| England beat Scotland by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IRE
(20 ov) 235/5
|
VS |
OMA
139(18 ov)
|
| Ireland beat Oman by 96 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.