आंध्र प्रदेश-ओडिसावर चक्रीवादळाचं संकट, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

आंध्र प्रदेश-ओडिसावर चक्रीवादळाचा मोठा धोका, पाहा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम

Updated: May 7, 2022, 02:54 PM IST
आंध्र प्रदेश-ओडिसावर चक्रीवादळाचं संकट, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? title=

कोलकाता : भारतात पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे कामलीची वाढणारी उष्णता आणि त्यात होणारा अवकाळी पाऊस असं विचित्र हवामान सध्या भारतात आहे. अशा परिस्थितीमध्ये आता भारतातील काही भागांना चक्रीवादळाचा धोका आहे. 

दक्षिण आंदमानकडे समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात आंध्र प्रदेश-ओडिसा भागांमध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवार ते शुक्रवार पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांना पावसाचा धोका आहे. ओडिसा सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ओडिशामध्ये अम्फान आणि फानी चक्रीवादळाचा धोका 2020-21 मध्ये बसला होता. यास चक्रीवादळाचा धोकाही बसला होता. 

महाराष्ट्राला अजून तरी या चक्रीवादळाचा थेट फटका बसणार नाही. महाराष्ट्रात पुढच्या आठवड्यात तीव्र उष्णतेची लाट असणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढणार आहे. 

अकोला,अमरावती, चंद्रपूर गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये येत्या आठवड्यात तीव्र उष्णतेची लाट असणार आहे. ओडिसाच्या दिशेनं येणाऱ्या चक्रीवादळाचा सध्या तरी महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार याची माहिती मिळाली नाही.