Trending Video : सासू - सूनेचं नातं हे बदनाम आहे. सासरी नवऱ्याशिवाय सूनेला कोणी विचारत नाही की तिला मान मिळत नाही. पण या जगात असे अनेक कुटुंब आहेत. जिथे सुनेला माहेरपेक्षा जास्त प्रेम, सन्मान आणि आदर मिळतो. त्या घरातील सासू ही सुनेची आई तर सासरे कधी वडील होता, हे त्यांनाही कळतं नाही. नवऱ्याच्या निधनानंतर अनेक महिला या सासर सोडून वेगळ्या राहतात किंवा माहेरी परत जातात. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. सध्या तो सोशल मीडियाचा जगात ट्रेंडमध्ये आहे, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. कारण त्यात या महिलेने ती नवऱ्याच्या निधनानंतरही सासरी का राहते यांचं कारण सांगितलंय. हा व्हिडीओ प्रत्येकाने बघावा असा आहे. भारतात पतीच्या निधनानंतर पत्नीचं काय होतं, तरदुसरी बाजू सासू सासरे हे सूनेला ओझे वाटतात. अशा प्रत्येकाने हा व्हिडीओ एका नक्की बघावा. (daughter in law decide to live with her in laws parents after the death of her husband emotional viral video trending now )
या व्हिडीओच्या सुरुवातीलाच एक महिला पुस्तक वाचताना दिसतंय आणि त्यावर लिहिलंय की, तू सासू सासऱ्यांसोबत का राहते असा प्रश्न विचारण्यात आलाय. त्यावर ती कारण की...या प्रश्नाचं उत्तर देताना हा व्हिडीओ जेव्हा पुढे जातो तो पाहूण डोळे पाणवतात. सासरे सुनेच्या डोक्यात तेल लावून देतात. तर सासू तिला खायला देतेय. यातून सासू सासरे आणि सुनेमधील नातं किती मजबूत आहे, हे दिसून येतं. तसंच आजी आजोबा म्हणूनही ते किती छान आहेत, हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलंय.
घरात असो किंवा बाहेर फिरायला जाणं असो, सासू सासरे, सून आणि नातवंड आनंदाने सुखात नांदताना दिसतं आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांच्यामधील प्रेम, नातं दिसून येतंय. नवऱ्या नसतानाही त्यांच्यामधील प्रेम कमी नाही तर अद्विगुणीत वाढलेलं दिसतंय. प्रत्येकाने पाहा असा व्हिडीओ आहे. सासू सासरे यांनी सूनेवर लेकीसारखी माया करावी आणि सुनेने पण त्यांच्यावर जीव लावावा. आयुष्य खूप कमी असतं, कधी काय होईल सांगता येत नाही, अशात नात्यात दुरावापेक्षा प्रेम असलं की, आयुष्य सोपं होतं.
yyogish ने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि त्याला 7.2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याला 11,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत, नेटिझन्सनी त्यावर भावनिक कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले- हे खूप निरोगी नाते आहे. जगाला असा सकारात्मक संदेश दिल्याबद्दल धन्यवाद, अशा कमेंट आल्या आहेत.