Delhi Murder: स्नेहा, निक्की, श्रद्धा, निकिता आणि आता... कधी बदलणार ही मानसिकता?

दिल्लीत राहाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. काही महिन्यांपूर्वीच श्रद्धा वालकर घटना घडली होती. मुली वेगवेगळ्या असल्या तरी आरोपींची मानसिकता तिच आहे. 

राजीव कासले | Updated: May 30, 2023, 02:35 PM IST
Delhi Murder: स्नेहा, निक्की, श्रद्धा, निकिता आणि आता... कधी बदलणार ही मानसिकता? title=

Murder Case : दिल्लीतल्या शाहबाद डेली परिसरात एका अल्पवयीन मुलीची (Delhi Murder Case) अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी साहिल (Sahil Sarfaraz) नावाच्या आरोपीला उत्तरप्रदेशमधल्या  (Uttar Pradesh) बुलंदशहरातून अटक करण्यात आली. या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) व्हायरल झालं असून या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. आरोपी साहिलने रविवारी 16 वर्षांच्या अल्पवयीन प्रियसची चाकूने वार करत हत्या केली. रस्त्यावर गाठत साहिलने आधी तिच्यावर चाकूने चाळीस वार केला. त्यानंतर दगडाने तिचं डोकं ठेचलं. 

मुलीची अशी निर्घृण हत्या झाल्याचं दिल्लीतलं हे पहिलं प्रकरण नाही. गेल्या साधरण वर्ष ते दोन वर्षात अशा भीषण घटना समोल आली आहेत. ज्यात प्रियकरने आपल्या प्रेयसीची अतिशय वाईट पद्धतीने हत्या केली. प्रेमप्रकरणात अशा घटना घडत आहेत. 

18 मे 2023: ग्रेटर नोएडामधल्या शिव नाडर युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या अनुज नावाच्या विद्यार्थ्याने आपली एकदम जवळची मैत्रिण आणि त्याच विद्यापीठात शिकणाऱ्या स्नेहा चौरसिया नावाच्या मुलीची गोळ्या झाडू हत्या केली. त्यानंतर अनुजने बॉईट हॉस्टेलमध्ये जाऊन स्वत: गोळी झाडत आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहा आणि अनुजचं प्रेमप्रकरण होतं, पण काही दिवसांपूर्वीने तीने अनुजशी ब्रेकअप केलं होतं. यातूनच तो नैराश्य होता.

एप्रिल, 2023 : दिल्लीतल्या मोलडबंद इथं प्रिन्स नावाच्या एका तरुणाने 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची चाकूने वार करत हत्या केली. दोघांचे प्रेमसंबंध होते. पण हत्येच्या काही दिवस आधी तरुणीने त्याच्याशी बोलणं बंद केलं आणि यातूनच प्रिंसने प्रेयसीवर चाकूने वार करत तिची हत्या केली. 

फेब्रुवारी 2023 : दिल्लीतल्या निगम बोध घाट इथं भांडण झाल्याने साहिल गहलोत नावाच्या तरुणाने निक्की यादव या तरुणीची डेटा केबलने गळा आवळून हत्याकेली. त्यानंतर त्याने निक्कीचा मृतदहे कारच्या पुढच्या सिटवर सिट बेल्ट लावून बांधला. तिथून 50 किलोमीटर दूर असलेल्या नजफगड इथं त्याने आपल्या मित्राच्या गावी मृतदेह नेला. तिथे त्याने एका धाब्यावरच्या फ्रीजमध्ये तो मृतदेह ठेवला. साहिलच्या घरच्यांनी त्याचं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं. निक्की यादवला ही गोष्ट कळली आणि त्यांच्या भांडण झालं. 

जानेवारी, 2023 : दिल्लीतल्या आदर्श नगर परिसरात सुखविंदर नावाच्या तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केली. तिच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं. त्यामुळे संतापलेल्या सुखविंदरने प्रेयसीची हत्या केली आणि तो अंबाला इथं पळून गेला, पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली. हत्येची सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसही हादरले होते. 

मे 2022 : दक्षिण दिल्लीतल्या मेहरौली इथं झालेल्या श्रद्धा वालकर हत्य प्रकरणाने तर संपूर्ण देश हादराल होता. हे प्रकरण अनेक दिवस चर्चेत राहिलं. आरोपी आफताब पूनावालेने प्रेयसी असलेल्या श्रद्धाची हत्या करत तिच्या मृतेदहाचे 35 तुकडे केल्या त्यानंतर ते फ्रिजमध्ये भरून ठेवले. टप्प्याटप्याने आफताबने ते तुकडे मेहरौलीच्या जंगलात फेकून दिले.

जुलै, 2022 : पूर्व दिल्लीतल्या विश्वास नगर भागातही अशीच एक भयानक घटना समोर आली होती. दीपक भाटी नावाच्या एका व्यक्तीने एका महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. दीपक आणि ती महिला रिलेशनशीपमध्ये होते. पण त्यानतंर कोणत्यातरी कारणावरुन त्या महिलेने दीपकशी बोलणं बंद केलं होतं. 

सप्टेबंर, 2021 : दिल्लीतल्या उत्तम नगरमध्ये राहाणाऱ्या अंकितने 22 वर्षांच्या तरुणीवर चाकूने अनेक वार करत तिची हत्या केली. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचं पोलिासांनी सांगितलं.

ऑक्टोबर, 2020 :  फरीदाबादमधल्या वल्लभगड इथं निकिता तोमर नावाची तरुणी आपल्या कॉलेजमधून बाहेर पडली. कॉलेजच्या बाहेर तिची आई आणि भाऊ वाट पाहात उभे होते. तितक्यात आय-20 कार इथं आली. त्यात बसलेल्या तौसीफ नावाच्या आरोपीने निकितावर झडप घातली. निकिताचं अपहरण करण्याचा त्यांचा डाव होता. पण यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे तौसीफने निकितावर गोळी झाडली. सुदैवाने गोळी निकिताच्या खांद्याला चाटून गेली. याप्रकरणी तौसिफसह आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली.