दिल्लीच्या खराब हवामानाचा एअर इंडियाला फटका

दिल्लीतील वातावरण आणखी खराब

Updated: Nov 3, 2019, 01:48 PM IST
दिल्लीच्या खराब हवामानाचा एअर इंडियाला फटका title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या खराब हवामानाचा फटका एअर इंडियाला बसलाय. खराब हवामानामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात सापडले असून, ही चिंतेची बाब आहे. अंधूक प्रकाशामुळं वाहतुकीलाही फटका बसलाय. १३ विमाने जयपूर, अमृतसर आणि लखनऊकडे वळवण्यात आलेत. तर इतर विमान वाहतुकीलाही फटका बसल्यानं विमानप्रवाशांची गैरसोय झाली आहे.

आकाशात असलेल्या पांढऱ्या धुक्यांमुळे इंदिरा गांधी एयरपोर्टवरुन होणाऱ्या हवाई वाहतूकीवर परिणाम झाला आहे.  अनेक विमानांचा रस्ता हा बदलण्यात आला आहे. दिल्लीला येणारे अनेक विमानं हे जयपूर, अमृतसर आणि लखनऊला डायवर्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

रविवारी सकाळी ९ वाजेपासून टर्मिनल-३ वरुन ३२ विमानं जयपूर, अमृतसर आणि लखनऊला डायवर्ट करण्यात आले आहे. रविवारी दिल्लीमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स ९०० च्या पुढे गेला आहे. अनेक भागात धुक्यांची चादर पसरली आहे.