नवी दिल्ली : अनेक वेळा आपली एक चूकी आपल्यासाठी मोठी अडचण होते आणि या चूकीची मोठी किंमत देखील आपल्याला फेडावी लागते. असचं काही झालयं गाझीयाबाजमधील एका Pizza डिलीव्हर करणाऱ्यावर. एका महिलेने Veg Pizza मागवाला होता पण डिलीव्हरी बॉयने Veg नाही तर Non-Veg Pizza घरपोच केला. त्यामुळे संबंधीत महिलेने आता 1 कोटी रूपयांची भरपाई मागीतली आहे. त्यामुळे आता हा मुद्द सध्या जोरदार चर्चेत आहे.
या महिलेने अमेरिकन पिझ्झा रेस्टॉरंटविरुद्ध ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला आहे. या महिलेचं नाव दीपाली त्यागी आहे. आम्ही शाकाहरी आहोत. त्यामुळे आमचा धर्म, संस्कार आणि मूल्यांनुसार शाकाहरी असणं आमच्यासाठी योग्य आहे. असं त्या म्हणाल्या.
काय आहे घटना
दीपाली त्यागी यांनी 21 मार्च, 2021 रोजी रेस्टॉरंटमधून veg Pizza मागवला होता. होळी असल्यामुळे दीपाली यांनी घरी Pizza मागवला होता. नेहमी Pizza 30 मिनिटांमध्ये घरी येतो. पण तेव्हा 30 मिनिटांनंतर Pizza डिलीव्हर झाला. जेव्हा त्यांनी Pizza खाल्ला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा Pizza Non Veg आहे. त्यामध्ये मशरूम ऐवजी मटन होतं.
Non Veg Pizza खाल्ल्यामुळे त्यागी कुटुंबाचा धर्म भ्रष्ट झाला असं सांगणयात येत आहे. त्यामुळए कुटुंबियांना मोठी मानसिक त्रास देखील सहन करावा लागला. आता याप्रकरणी 17 मार्चला सुनावणी होणार आहे.