.. म्हणून पूर्वी २० नोव्हेंबरला साजरा होत होता 'बालदिन'

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो.

Updated: Nov 14, 2017, 11:31 AM IST
.. म्हणून पूर्वी २० नोव्हेंबरला साजरा होत होता 'बालदिन'  title=

मुंबई : भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो.

'बालदिन' सेलिब्रेशनची ही गोष्ट लहानपणापासून आपण पुस्तकांमध्ये वाचतोय. नेहरूंना लहान मुलं आवडत असतं ती त्यांना 'चाचा नेहरू' म्हणत ही माहितीदेखील आपल्याला अभ्यासक्रमातून मिळाली होती. पन तुम्हांला ठाऊक आहे का ? १४ नोव्हेंबर आधी बालदिन एका वेगळ्याच तारखेला साजरा केला जात होता. 

पंडीत नेहरूंच्या मते, लहान मुलं ही देशाचं भविष्य असतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम आणि पालन पोषण योग्य रित्याने केलेच पाहिजे. लहान मुलांना प्रगतीचा वाव  देणं गरजेचे आहे. 

संयुक्त राष्ट्रामध्ये १९५४ सालापासून २० डिसेंबर हा दिवस इंटरनॅशनल चिल्ड्रन्स डे म्हणून साजरा करत आहे. जगभरातील लहान मुलांचे उत्तमरित्या पालन पोषण व्हावे, त्याला चालना मिळावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जात असे. 

१९६४ साली नेहरूंचे निधन झाले. त्यानंतर सर्वमताने नेहरूंचा जन्मदिवस हाच भारतात बालदिन म्हणून साजरा केला जावा असे ठरले. आणि भारताला जगापेक्षा वेगळा बालदिन साजरा करण्याची संधी मिळाली.