Home Loan | Pre-EMI आणि Full-EMI कशात अनेकांना होतं नुकसान? नेमका काय आहे याचा अर्थ?

कोणत्या परिस्थितीसाठी कोणता ईएमआय तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल हे सांगणार आहोत.

Updated: Jul 18, 2021, 06:52 PM IST
Home Loan | Pre-EMI आणि Full-EMI कशात अनेकांना होतं नुकसान? नेमका काय आहे याचा अर्थ? title=

मुंबई : आपल्यापैकी बरेच लोक सध्या घर घेण्याचे स्वप्न पहात असतील, काही लोकं त्यांना रहाण्यासाठी घराच्या शोधात असातात. तर काही लोकं फक्त गुंतवणूक म्हणून एखाद घर घेऊन ठेवतात. जर आपण देखील असे काहीतरी योजना आखत असाल आणि कर्जाद्वारे बिल्डरला पैसे देत असाल तर तुम्हाला प्री-ईएमआय आणि फुल-ईएमआय बद्दल माहित असणे आवश्यक आहे. तुमचा पैसा कुठे आणि कसा वापरला जातो याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही बांधकाम सुरु असलेल्या मालमत्तेत गुंतवणूक कराल आणि तुम्हाला कर्जाद्वारे पैसे भरायचे असतील, तर तेव्हा तुम्हाला प्री-ईएमआय आणि फुल-ईएमआय या दोन्हाचा वापर होतो. परंतु तो केव्हा लावला जातो हे जाणून घ्या.

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला दोन्ही ईएमआयचा अर्थ सांगणार आहोत आणि कोणत्या परिस्थितीसाठी कोणता ईएमआय तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल हे सांगणार आहोत.

Pre-EMI म्हणजे काय?

उदाहरणार्थ, समजा तुम्ही फ्लॅट बुक केला असेल आणि त्यासाठी 50 लाख रुपयांचे कर्ज असेल आणि तुमचा फ्लॅट तयार होत आहे.  म्हणजेच हा फ्लॅट रोडी टू मूव्ह नाही आहे. तरीही तुम्हाला तुमच्या कर्जाची ईएमआय भरावा लागतो. तर अशा ईएमआयला Pre-EMI म्हटले जाते.

यामुळे जोपर्यंत बांधकाम चालू आहे, तोपर्यंत बँक बिल्डरला संपूर्ण पैसे दिले जात नाही. अशा परिस्थितीत आपल्या फ्लॅटच्या बांधकामानुसार बँक बिल्डरला कर्जाची रक्कम देत असते. या दरम्यान, आपण ईएमआयद्वारे बिल्डरला अंशतः देय म्हणजेच पार्शियल पेमेंट देतो. त्यात केवळ इंटरेस्ट दिला जातो.

EMI कसा निश्चित केला जातो?

प्री-ईएमआयवर नेहमीच सिम्पल इंटरेस्ट लावला जातो. समजा तुम्ही 50 लाख रुपयांचे गृह कर्ज (home loan) घेतले असेल. त्याचे पहिले वितरण 5 लाख रुपये आणि व्याज 7.5% आहे. म्हणजेच ताबा घेण्यापूर्वी बिल्डरला पहिल्या हप्त्यामध्ये पाच लाख रुपये मिळाले आहेत.

मग जस जसे बिल्डरला पैसे मिळत जाईल तसा तसा तुमचा ईएमआयही वाढेल. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर हा पर्याय आपल्यासाठी चांगला आहे. कारण सुरुवातीला तुमचा ईएमआय कमी असेल. ज्याचा फायदा तुम्हाला होईल. त्याशिवाय जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल आणि ताब्यात घेतल्यानंतर मालमत्ता विकायची असेल, तर हा पर्याय चांगला आहे.

Full-EMI म्हणजे काय?

जेव्हा बिल्डरला थोडा थोडा करुन बँकेकडून रक्कम मिळते, तेव्हा तुम्हाला प्री-ईएमआय भरावा लागतो आणि घर तुमच्या  ताब्यात येईपर्यंत हा प्रीमियम भरावा लागतो. परंतु जेव्हा घर तुमच्या ताब्यात येतो तेव्हा बँकेकडून बिल्डरला संपूर्ण देय दिले जाते. ही संपूर्ण रक्कम दिल्यानंतर मग तुम्हाला संपूर्ण ईएमआय म्हणजेच Full-EMI द्यावा लागेल, ज्यामध्ये व्याज आणि प्रिन्सिपल दोन्ही समाविष्ट असतील.

परंतु लक्षात ठेवा की, जेव्हा बँक सुरवातीला बिल्डरला पैसे दोते तेव्हा तुमचा फक्त इंटरेस्ट कट होतो. प्रिन्सिपल अमाउंट ही तुम्हाला घराचा ताबा मिळाल्यानंतरच मिळते.