मतदान केल्याने मिळणार पेट्रोल-डिझेलच्या दरात सुट

ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून एक घोषणा करण्यात आली आहे. 

Updated: Apr 6, 2019, 02:30 PM IST
मतदान केल्याने मिळणार पेट्रोल-डिझेलच्या दरात सुट title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान लवकरच सुरू होणार आहे. ७ टप्प्यात पार पडणाऱ्या मतदानात पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिल रोजी होणार आहे. निवडणुकीला लक्षात घेत अनेक सामाजिक संस्थांने एक पाऊल पुढे उचलताना दिसत आहेत. मतदारांना जागृत करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून एक घोषणा करण्यात आली आहे.  पेट्रोल-डिझेलवर प्रतिलीटर 50 पैसे सूट मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

मतदानाच्या दिवशी पेट्रोल-डिझेलवर सुट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मतदारांसाठी ही ऑफर मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे, अशी माहिती  इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी दिली. या योजनेचा फायदा घेण्यासाठी मतदारांना त्यांच्या बोटावर असलेले मतदानाचे  चिन्ह दाखवणे आवश्यक आहे.
 
पेट्रोल पंपावरील कामगार सुद्धा मतदारांना जागरूक करण्याचे काम करणार आहेत. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची मोहीम राबवली जाणार आहे. ११ एप्रिल रोजी सुरू होणारे मतदान १९ मे रोजी समाप्त होणार आहे. लोकसभा निवडणुकीत ९० कोटी भारतीयांनी आपला हक्क बजावायचा आहे. संपूर्ण भारतात एकुण ६४ हजार पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी २५ टक्के पेट्रोल पंप ग्रामीण भागात आहेत.