Shraddha Murder Case: श्रद्धा मृत की जिवंत??? डॉक्टरांच्या माहितीनंतर एकच खळबळ!

Shraddha Walkar is Dead or Alive: श्रद्धाच्या मृत्यूबाबत डॉक्टरांना महत्त्वाचा पुरावा हवा असल्याने पोलिसांनी डॉक्टरांची मदत घेतली. त्यानंतर आता सर्वांची झोप उडवणारी माहिती समोर आली आहे.

Updated: Dec 2, 2022, 06:33 PM IST
Shraddha Murder Case: श्रद्धा मृत की जिवंत??? डॉक्टरांच्या माहितीनंतर एकच खळबळ! title=
Shraddha Murder Case

Shraddha Murder Case: अवघ्या देशाला हादरावून सोडणाऱ्या दिल्लीमधील (Delhi Crime) श्रद्धा हत्याकांड प्रकरणाची (Shraddha Murder Case) नवनवीन खुलासे समोर आले आहेत. पोलीस या प्रकरणात प्रत्येक अँगलने चौकशी करत असल्याचं दिसतंय. अशातच श्रद्धा खून प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आलेली (Shraddha Murder Case Update) आहे. श्रद्धाच्या मृत्यूबाबत डॉक्टरांना महत्त्वाचा पुरावा हवा असल्याने पोलिसांनी डॉक्टरांची मदत घेतली. त्यानंतर आता सर्वांची झोप उडवणारी माहिती समोर आली आहे.

श्रद्धाच्या मृत्यूबाबत डॉक्टरांना अद्याप महत्त्वाचा पुरावा मिळाला नाही. त्याशिवाय तिच्या मृत्यूबाबत खात्री करता येणार नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. श्रद्धा वालकरचा डीएनए रिपोर्ट (DNA Report) पुढील आठवड्यामध्ये अपेक्षित आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलंय. सापडलेल्या हाडांची विशिष्टपणे तपासणी होईल, त्यानंतर ती हाडं श्रध्दाची आहेत की नाही? याची तपासणी होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

एएनआयने (ANI) याबाबत वृत्त दिलंय. श्रद्धाचे शरिराचे अनेक तुकडे अद्याप पोलिसांना मिळाले नाहीत. त्यामुळे तपासात अडथडा येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आफताबची नार्को (Narco Test) आणि पॉलिग्राफ चाचणी (Polygraph Test) करण्यात आली आणि त्यात त्याने चांगला प्रतिसाद दिलाय, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

आणखी वाचा - Shraddha Murder Case: श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबच्या हातावर....; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर

दरम्यान, दिल्लीत 14 नोव्हेंबरला मन सुन्न करणारी घटना समोर आली होती. विकृत प्रियकराने (Aftab Poonawalla) आपल्या प्रेयसीची हत्या तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. गेल्या सहा महिन्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या विकृती प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर आता नवनवीन महिती मिळत असल्याचं दिसतंय.