वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव: जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या भावात गेल्या 24 तासात एक हजारांची वाढ झाली असून चांदीच्या भावात अडीच हजार (Gold price hike 2022) रुपयांची वाढ झाली आहे. गेले चार महिन्यानंतर ही विक्रमी सोन आणि चांदीच्या (gold and sliver news) भावामध्ये वाढ झालेली आहे. जागतिक बँकेच्या व्याजदर घटल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली असून याचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर झाला असल्याचे मत व्यापाऱ्यांनी (businessmen) व्यक्त केले आहे. जळगाव सुवर्ण नगरीत पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या भावात एक हजारांची वाढ झाली असून चांदीच्या भावात अडीच रुपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याचे दार 55 हजार 100 प्रतितोला तर चांदी 66 हजार400 प्रतिकिलो भाव आहेत. बँकेचे (bank rate) दर कमी झाल्यामुळे सोन्या चांदीत गुंतवणूकित वाढ झाली आहे, त्याचा हा परिणाम असल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली आहे. सध्या लग्नसराई (wedding news) सुरू आहे मात्र अचानक सोन्या चांदीच्या दारात वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये (customers) नाराजी आहे. दर वाढल्याने अनेकांचे बजेट कोलमडले असून भावात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. (gold price hike 2022 gold and silver price raises by 1000 and 2500 rupees respectively in last 24 hours)
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) मार्केटवर शुक्रवारी दुपारी 12.30 च्या सुमारास, सोन्याचा फ्यूचर रेट 41 रुपयांनी घसरला आणि 52 हजार 630 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता. तर चांदी 147 रुपयांनी घसरून 61 हजार 846 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत असल्याचे दिसून आले. सत्राच्या सुरुवातीला सोने 52 हजार 671 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61 हजार 993 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. सराफा बाजारातही सोन्याच्या (Gold Rate) दरात घसरण झाली. इंडिया बुलियन्स असोसिएशनने जाहीर केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 41 रुपयांनी घसरून 52 हजार 662 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी 999 शुद्धतेची चांदी 61 हजार 777 रुपये प्रति किलोवर पोहोचली. 23 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार 451 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचा दर 48 हजार 238 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटचा दर 39 हजार 497 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
हेही वाचा - Weather News: राज्यात पारा घसरुन 9.5 अंशांवर; जाणून घ्या हिवाळी सहलीसाठीची सर्वोत्तम जागा
दागिने घेताना मेकिंग/डिझाइनिंग शुल्क भरावे लागते. तसेच विमा आणि स्टोरेज शुल्क देखील लागू शकते. ज्वेलर्स तुमच्या खरेदीवर तुमच्याकडून जीएसटी देखील घेतात. डिजिटल गोल्डवर (digital gold gst) जीएसटी भरावा लागतो. दुसरीकडे स्प्रेड चार्ज म्हणजेच खरेदी आणि विक्रीमधील फरक कॅलक्युलेट (calculate) केला जातो. गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करताना एक्सपेंस रेशियो, डिमॅट अकाउंट फीस आणि ब्रोकरेज चार्ज द्यावा लागतो. सॉवरेन गोल्डवर कोणतंही शुल्क (price) देण्याची आवश्यकता नसते.