VIRAL VIDEO : मालकाचं वर्क फ्रॉम होम आवडलं नाही म्हणून या श्वानने काय केलं पाहा

पाहा व्हिडिओ

Updated: Jun 19, 2021, 12:53 PM IST
VIRAL VIDEO : मालकाचं वर्क फ्रॉम होम आवडलं नाही म्हणून या श्वानने काय केलं पाहा

मुंबई : भारतात 2020 पासून कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात होवू नये म्हणून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची म्हणजे वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा दिली. गेल्या वर्षभरापासून अनेक कर्मचारी घरून आपली कामं पूर्ण करत आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला प्रचंड हासू येईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा तणाव काही क्षणांसाठी नक्कीचं दूर होईल. 

पाहा व्हिडिओ

व्हिडिओमध्ये एक श्वान आणि त्यांचा मालक दिसत.  वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे मालकं कामाला बसण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे.  मालक लॅपटॉपवर काम करण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते श्वान त्याच्या मालकाला कामचं करून देत नाही. त्यामुळे मालीक आणि त्याच्या श्वानाचा प्रेमळ नातं आणि त्यांचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.