भगवंत मान यांना दुहेरी आनंदाचा योग, शपथविधी दरम्यान या खास व्यक्तींची 7 वर्षानंतर भेट

भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे नवे मुख्यमंत्री (Punjab CM) बनले आहेत. भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्याला लाखो लोकं उपस्थित होते. ज्यामध्ये दोन व्यक्तींची सर्वाधिक चर्चा होती. हे दोघेही शपथविधीसाठी अमेरिकेहून आले होते. आम्ही बोलतोय भगवंत मान यांच्या मुलांबद्दल. दोघे सात वर्षांनी आपल्या वडिलांना भेटले. (punjab cm bhagwant mann met his children after 7 years)

Updated: Mar 17, 2022, 06:24 PM IST
भगवंत मान यांना दुहेरी आनंदाचा योग, शपथविधी दरम्यान या खास व्यक्तींची 7 वर्षानंतर भेट title=

मुंबई : भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे नवे मुख्यमंत्री (Punjab CM) बनले आहेत. भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्याला लाखो लोकं उपस्थित होते. ज्यामध्ये दोन व्यक्तींची सर्वाधिक चर्चा होती. हे दोघेही शपथविधीसाठी अमेरिकेहून आले होते. आम्ही बोलतोय भगवंत मान यांच्या मुलांबद्दल. दोघे सात वर्षांनी आपल्या वडिलांना भेटले. (punjab cm bhagwant mann met his children after 7 years)

भगवंत मान यांचा मुलगा दिलशान मान (17) आणि मुलगी सीरत कौर मान (21) आई इंद्रप्रीत कौरसोबत अमेरिकेत राहतात. मान आणि इंद्रप्रीत 2015 मध्ये वेगळे झाले. तेव्हापासून दिलप्रीत या दोन्ही मुलांसह अमेरिकेत राहत आहेत.

भगवंत मान यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या पत्नीनेही त्यांना पूर्ण साथ दिली. त्यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात अनेक सभा घेतल्या. निवडणूक प्रचारादरम्यान इंद्रप्रीतच्या प्रभावी भाषणांची बरीच चर्चा झाली. त्या काळात तर असे म्हटले जात होते की, विधानसभा निवडणुकीत इंद्रप्रीतला ‘आप’ने तिकीट दिल्यास त्या सहज निवडून आल्या असत्या.

20 मार्च 2015 रोजी भगवंत मान इंद्रप्रीत कौर (Indrapreet Kaur) यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जात मान यांचा युक्तिवाद होता की, राजकारणामुळे ते पत्नीपासून घटस्फोट घेत आहे. लोकांनी त्यांना विश्वासाने निवडून दिले आहे. वृत्तानुसार, कोर्टात दिलेल्या अर्जात भगवंत मान यांच्या पत्नीने अशी अट घातली होती की, जर भगवंत मान भारत सोडून कॅलिफोर्नियाला येत असतील तर त्या घटस्फोटाचा अर्ज मागे घेतील. 

दुसरीकडे, मान यांना राजकारण सोडून परदेशात जायचे नव्हते. लोकांच्या विश्वासाला तडा दिला जाऊ शकत नाही, असा मान यांचा युक्तिवाद होता. जर इंदप्रीत कौर भारतात स्थायिक होण्यास तयार असतील तर ते घटस्फोटाचा अर्ज मागे घेतील.

कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही भगवंत मान यांचा राजकारणातील दर्जा वाढला. 2019 मध्ये मान दुसऱ्यांदा लोकसभेचे खासदार झाले. आता पंजाबचे 25 वे मुख्यमंत्री झाले आहेत. यानंतरही कुटुंबाच्या वियोगाची वेदना त्यांच्या हृदयात आहे. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले होते की, राजकारणामुळे मी माझी मुले आणि कुटुंब गमावले. तो आता अमेरिकेचा नागरिक आहे. त्याने या मुलाखतीत इतकेच सांगितले की तो आता आपल्या मुलांशी बोलतही नाही.