Viral Video : स्वतःच्या लग्नात नवरी टल्ली; व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

नव्या नवरीचा हटके अंदाज सोशल मीडियावर व्हायरल 

Updated: Aug 19, 2021, 10:32 AM IST
Viral Video : स्वतःच्या लग्नात नवरी टल्ली; व्हिडिओ पाहून व्हाल हैराण title=

मुंबई : इंटरनेटवर सध्या लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही व्हिडिओ अत्यंत भावूक तर काही व्हिडिओ पोट धरून हसालया भाग पाडतात. पण आता जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्ही हैराण व्हाल. व्हिडिओमध्ये नवीन नवरी चक्क नशा करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नवरीने लेहेंगा घातला आहे. नवरी जमिनीवर बसून दारू पिताना दिसत आहे. 

ही नवरी नातेवाईकांनाही न घाबरता व्हिडिओमध्ये चिल करताना दिसत  आहे. नवरीचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 हजार 955 पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. सध्या सर्वत्र याच नवरीची चर्चा आहे.