होळीच्या डान्समध्ये नशेत 15 सेकंदात त्याने स्वत:ला असं संपवलं, व्हिडीओ व्हायरल

बऱ्याचदा लोकं स्टाईल दाखवण्याच्या नादात काहीही करायला तयार होतात. मग त्याच्यापासून होणाऱ्या फायदा आणि तोट्याचा कोणीही विचार करत नाही.

Updated: Mar 20, 2022, 04:39 PM IST
होळीच्या डान्समध्ये नशेत 15 सेकंदात त्याने स्वत:ला असं संपवलं, व्हिडीओ व्हायरल title=
प्रतिकात्मक फोटो

भोपाळ : बऱ्याचदा लोकं स्टाईल दाखवण्याच्या नादात काहीही करायला तयार होतात. मग त्याच्यापासून होणाऱ्या फायदा आणि तोट्याचा कोणीही विचार करत नाही. सोशल मीडियावर यासंबंधीत अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल. ज्यामुळे बऱ्याचदा आपल्या आपलं असू आवरत नाही. तर कधी कधी हा प्रकार जास्तच गंभीर होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मध्यप्रदेश मधील आहे. जेथे एक व्यक्ती होळी सेलेब्रेशनदरम्यान असं काहीतरी करतो. ज्यामुळे त्याने त्याचे प्राण गमावले आहे. त्याच्या स्टाईल मारण्याच्या नादात त्याला आपले प्राण गमवायला लागू शकतील असा त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नसावा.

गोपाळ सोलंकी असे या व्यक्तीचे नाव आहे. जो गुरुवारी रात्री होळीच्या सेलेब्रेशनदरम्यान आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत डीजेच्या तालावर नाचत होता. यावेळेला गोपाळ दारुच्या नशेत होता. तेव्हा स्टाईल मारण्यासाठी गोपाळने हातात सुरी घेतली होती आणि तो नाचू लागला. यासगळ्यात त्याने स्वत:ला खोटं खोटं सुरू मारण्याची एक्टिंग केली खरी परंतु त्याने यासगळ्यात स्वत:लाच सुरी मारुन घेतली.

त्याने एकदा दोनदा नाही तर चक्कं 3/4 वेळा आपल्या छातीत सुरी मारुन घेतली. ज्यामुळे काही वेळातच त्याच्या छातीतून रक्त येऊ लागलं.

एवढं होऊन देखील या व्यक्तीला काही काळ कळलंच नाही की, त्याने काय केलं आहे. परंतु काही काळाने त्याला जाणवलं की, त्याने स्वत: वरच वार केला आहे. रक्त आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील एका महिलेनं पाहिलं. ज्यामुळे लगेच गोपाळला अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यानच गोपाळचा मृत्यू झाला.

कुटुंबातीलच एक व्यक्ती जेव्हा या सगळ्यांचा डान्स कॅमेरात शूट करत होता. तेव्हा हा प्रकार उघड झाला. या व्हिडीओला हजोरो लोकांनी पाहिलं आहे आणि अनेक लोक यावर आपल्या प्रतिक्रीया देखील देत आहेत.