आधार कार्ड डाऊनलोड करणे अधिक सोपे, UIDAI कडून खास लिंक

Aadhaar Card : आज आधार कार्ड खूप महत्व प्राप्त झाले आहे. आता तुम्ही तुमचे Aadhaar Card काही मिनिटात सहज डाऊनलोड करु शकता.  

Updated: Jul 3, 2021, 08:47 AM IST
आधार कार्ड डाऊनलोड करणे अधिक सोपे, UIDAI कडून खास लिंक title=

मुंबई : Aadhaar Card : आज आधार कार्ड खूप महत्व प्राप्त झाले आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card )आवश्यक लागते. त्यामुळे आता प्रत्येकाकडे आधार कार्ड असते. मात्र, काही वेळा आपले आधार कार्ड घरी राहिले तर अडचण निर्माण होते. अशावेळी काय करायचे असा प्रश्न तुमच्यापुढे असतो. आता घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे Aadhaar Card काही मिनिटात सहज डाऊनलोड करु शकता. यासाठी UIDAIकडून मदत करण्यात आली आहे. तशी खास लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आधार कार्ड किती महत्त्वाचे हे सगळ्यांच माहिती आहे. बँकेपासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारची नितांत आवश्यकता लागते. ही गरज लक्षात घेऊन आता UIDAI ने आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सोपी सहज सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. UIDAI ने एक लिंक दिली आहे. याच्या मदतीने तुम्ही सहज आधार डाऊनलोड करु शकता. 

असे करा तुमचे Aadhaar Card  डाऊनलोड

UIDAI ने ट्विटरद्वारे एक डायरेक्ट लिंक शेअर केली आहे. या लिंकवर क्लिक करुन तुम्ही कधीही तुमचे स्वत:चे आधार कार्ड डाऊनलोड करु शकता.  त्यासाठी तुम्ही या eaadhaar.uidai.gov.in लिंकची मदत घेऊ शकता. त्यामुळे सहजरित्या आधार कार्ड मिळू शकेल.

 Aadhaar Card डाऊनलोड करण्यासाठी

सर्वात आधी UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://eaadhaar.uidai.gov.in/ वर जा. यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला आधार डाऊनलोड करण्याचे तीन पर्याय दिसतील. पहिला पर्याय 12 आकडी आधार नंबर टाकण्याचा असेल, दुसरा एनरोलमेंट आयडी आणि तिसरा व्हर्च्युअल आयडी टाकण्याचा आहे. यापैकी कोणताही आयडी अथवा नंबर टाकून तुम्ही आधार कार्ड पुन्हा डाऊनलोड करु शकता.

संपूर्ण माहिती भरल्यानंतर इमेजमध्ये (कॅप्चा) देण्यात आलेले कॅरेक्टर्स टाइप करा आणि त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. वन-टाइम पासवर्ड आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबर येईल. व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक केल्यानंतर नंबर एसएमएसद्वारे मिळेल.

ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला आधार कार्डची माहिती आणि आधार डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल. यानंतर डाऊनलोड पर्यायावर क्लिक करुन सेव्ह करुन तुमचे आधार कार्ड मिळेल.

E-Aadhaar Card, PDF फॉर्मेटमध्ये डाऊनलोड होतो. त्यामुळे सिस्टममध्ये पीडीएफ खोलण्याआधी फाइल सपोर्ट करणारे सॉफ्टवेअर असणे गरजेचे आहे. याशिवाय ई-आधार डाऊनलोड करण्याआधी पासवर्ड प्रोटेक्टेड असतो. आधार कार्ड दिसण्यासाठी एक पासवर्ड आवश्यक आहे.