Earthquake in Delhi : उत्तर भारत भूकंपाने हादरला आहे. उत्तर भारतातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली भूकंपाच्या 5.4 तीव्रतेची नोंद झाली. जम्मूतील डोडा जिल्ह्यात भूकंपाचं केंद्रबिंदू आहे. सुमारे 15 मिनीटांपर्यंत हे भूंकपाचे धक्के जाणवत होते. भूंकपाच्या हादऱ्यामुळे नागिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अद्याप कोणतीही जीवत अथवा वित्त हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
दिल्ली-एनसीआर भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी नोंदवली गेली. रात्री 9 वाजून 34 मिनिटांनी भूकंपाचा हा धक्का जाणवला. अफगाणिस्तानच्या हिंदू कूश पर्वत रांगेत या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.. पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. तसंच दिल्लीसोबत जम्मू-काश्मीर, चंदीगढ आणि मोहालीतही भूकंपाचा धक्का बसला.
उत्तर भारत आणि दिल्लीसह जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. जून महिन्यापासून वेगवेगळ्या तीव्रतेचे 12 धक्के बसले आहेत. याआधी, 10 जुलै रोजी सकाळी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले होते. 4.9 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे हे भूकंप होते. 13 जून रोजी, डोडा जिल्ह्यात 5.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता. यावेळी अनेक घरांसह इमारतींना तडे गेले होते.
अफगाणिस्तानात दररोज भूकंप धक्के जाणवत आहेत. 2-3 आठवड्यांनी अफगाणिस्तानात तीव्रतेचे भूकंप होत आहेत. 11 मे रोजी फैजाबादच्या दक्षिण-नैऋत्येस 99 किमी अंतरावर 4.5 तीव्रतेचा भूकंप झाला होता. तसेच फैजाबादमध्ये 9 मे रोजी 4.3 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. गेल्या महिन्यात, तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ANDMA) ने अहवाल दिला की जुलैमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे 13 प्रांतांमध्ये किमान 42 लोक ठार झाले होते. यात 54 जण जखमी झाले होते.