नवी दिल्ली : राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शपथग्रहन केल्यावर आम्ही लगेचच काम सुरू केले. नवीन सरकारला पंतप्रधान मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा यांचे आशिर्वाद आहेत. आज निर्मला सीतारामन आणि नितिनजी गडकरी यांचीही भेट घेतली. या सर्वांचे मार्गदर्शन नवीन सरकारला असेल.'
मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
- नितिन गडकरी त्यांच्यामुळे मुंबई- पुणे अंतर कमी झाले
- खालापूर ते सिंहगड इंन्स्टिट्युट एक बोगदा बनवला जात आहे, 20-25 मिनिटात पुण्याला पोहचू शकतो.
- समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून त्यांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली. समृद्धी महामार्गामुळे यामुळे आजूबाजूच्या परिसराचा विकास होणार आहे
- नितिन गडकरी यांचे महाराष्ट्राकडे विशेष लक्ष असून त्यांनी सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
- महाराष्ट्र संतांची भूमी, महाराष्ट्र देशाच्या विकासाचे नेहमीच इंजिन राहिले आहे.
- राज्यात जो कोणता उद्योग येईल त्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल.
- राज्याचा GDP सर्वात अधिक, निर्यात सर्वाधिक, परदेशी गुंतवणूक 26% आहे.
- राज्यात Good governance असल्याचा अहवाल आहे.
- या सरकारला केंद्र सरकारचा आशीर्वाद असून पेट्रोल डिझेलवरील वॅट कमी करण्याबाबत आम्ही विचार करत आहोत.
- हे सरकार शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार
- महागाई खूप वाढत आहे, इथेनॉलमुळे खर्च कमी होईल
- औरंगाबाद येथील शेंद्रा-बिडकीन तयार झाले आहे. 3 लाख रोजगार मिळणार, पंतप्रधानांनी हा प्रकल्प देशाला समर्पित केला आहे.
- नितिन गडकरी सुपरमॅन म्हणायला हवं
- मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला सुपरपॉवर बनवणार.