Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

पश्चिम बंगालसह 5 राज्यांत विधानसभा निवडणुकांची (Assembly Elections 2021) घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली आहे.  

Updated: Feb 26, 2021, 05:53 PM IST
Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
Pic Courtesy: ANI

नवी दिल्ली :  पश्चिम बंगालसह 5 राज्यांत विधानसभा निवडणुकांची (Assembly Elections 2021) घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली आहे. पश्चिम बंगालसह आसाम, केरळ, तामिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथे निवडणुका होणार असल्याचे त्यांनी म्हटले. आज निवडणूक आयोगाने दिल्ली स्थित विज्ञान भवनात आज पत्रकार परिषदेत घेत चार राज्य आणि एक केंद्रशासिस प्रदेशात निवडणुकीची घोषणा केली आहे. (Election Commission announces  Assembly Elections 2021 for West Bengal, Tamil Nadu, Assam, Kerala , Puducherry)

 यावेळी निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले की, कोरोना संक्रमण काळात पार पडलेल्या बिहार निवडणुका यशस्वी ठरल्या. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या संख्येत मतदान केले गेले आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम ही चार राज्य तर पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभा निवडणुकांसंंबंधी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

तामिळनाडू राज्य

तामिळनाडूत विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान  
अधिसूचना जारी होणार – 12 मार्चला
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च
उमेदवारी अर्जाची छाननी – 20 मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – 22 मार्च

केरळ राज्य

अधिसूचना जारी होणार – 12मार्चला
उमेदवारी अर्जाची छाननी – 20 मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – 22मार्च
केरळमध्ये मतदान – 6 एप्रिल
मतमोजणी – 2 मे

पश्चिम बंगालमध्ये 294 मतदार संघ आहेत. सर्वाधिक जास्त जागा पश्चिम बंगालमध्ये असल्याने भाजपनेही येथे सत्ता परिवर्तनासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनेही सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणीवर भर दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, भाजपनेही येथे आव्हान उभे केले आहे. 

राज्यातील निवडणूक कार्यक्रम 

आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणूक
पहिला टप्पा 27 मार्चला मतदान-47 मतदार संघ- निकाल 2 मे
दुसरा टप्पा- 1एप्रिल मतदान- 2 मे ला निकाल
तिसरा टप्पा 6 एप्रिल - 2 मे ला निकाल
 
केरळ एकाच टप्प्यात मतदान

मतदान 6 एप्रिल ला मतदान- 2 मे निकालॉ
 
तामिळनाडूमध्येही एकाच टप्प्यात निवडणूक
मतदान 6 एप्रिल- 2 मे रोजी निकाल
कन्याकन्याकुमारीत लोकसभेसाठी पोटनिवडणूक- ६ एप्रिल 

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान

पहिला टप्पा-27 मार्च
दुसरा टप्पा- 1एप्रिल
तिसरा टप्पा 6एप्रिल
चौथा टप्पा - 10 एप्रिल
पाचवा टप्पा- 17एप्रिल
सहावा टप्पा- 22 एप्रिल
सातवा टप्पा - 26 एप्रिल
आठवा टप्पा- 29एप्रिल

तमिळनाडूत 234 जांगासाठी तर केरळमध्ये140 जागांसाठी हे मतदान होत आहे. आसाम येथे  126 मतदार संघात निवडणूक होत आहे. पुडुचेरी या केंद्रशासिस प्रदेशात काँग्रेसला पायउत्तार व्हावे लागले आहे. याठिकाणीही आता निवडणूक होत आहे. या ठिकाणी 30 मतदार संघात निवडणूक होत आहे.

या निवडणुका कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांना कोरोना नियमांचे पालन गरजेचे आहे. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी केवळ पाच जणांना परवानगी असेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले. तसेच  उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असेल. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. मतदानासाठी एका तासाची वेळ वाढविली जाणार आहे.  मतदारांच्या सोईसाठी तब्बल 2.7 लाख मतदान केंद्र असतील. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 18 कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. तसेच एकूण ८२४ विधानसभा जागांसाठी मतदान होईल. प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्र हे तळ मजल्यावरच असेल, असे त्यांनी सांगितले.