मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्याच्या निवडणूक तारखा जाहीर

निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. 

Updated: Jan 18, 2018, 12:32 PM IST
मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्याच्या निवडणूक तारखा जाहीर title=

नवी दिल्ली : मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्यातील निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यात.

त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मेघालय, नागालॅंडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.  ३ मार्चला तिन्ही राज्याचे निवडणूक निकाल जाहीर केले जातील. 

तिन्ही राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असून तिन्ही राज्यांमध्ये व्हीव्हीपीटीएचा वापर होणार आहे. मेघालया, नागालॅंड आणि त्रिपुरा या तिन्ही राज्यांमध्ये ६० विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्रिपुरामध्ये सध्या डाव्यांची सत्ता आहे. मेघालयमध्ये कॉंग्रेसची तर नागालॅंडमध्ये पिपल्स फ्रन्ट-लीड डेमोक्रॅटीक युतीची सत्ता आहे. डेमोक्रॅटीक युती ही भाजप द्वारे समर्थित आहे.

मेघालयमध्ये महिला मतदार जास्त

मेघालयमध्ये सर्वात जास्त मतदार आहेत. याबाबतीत इथे महिलांनी पुरुषांना मागे सोडलं आहे. राज्यात ५०.४ टक्के महिला मतदार आहेत. एकूण मतदारांची संख्या १८,३०,१०४ आहे. त्यात ९,२३,८४८ महिला मतदार आहेत.

या तीन राज्यातील सरकारचा कालावधी क्रमश: ६ मार्च, १३ मार्च आणि १४ मार्चला संपुष्टात येत आहे.