त्रिपुरा विधानसभा निवडणूक निकाल: डाव्यांच्या गडाला धक्का, कमळ फुलले

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत डाव्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. गेली २५ वर्षे सत्ता कायम ठेवणाऱ्या डव्यांना पहिल्यांदाच तडाखा बसला असून, आतापर्यंत एकही जागा नसलेल्या भाजपने बुहमताचा आकडा पार करत सत्तेचे कमळ फुलवले आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 3, 2018, 11:57 AM IST
त्रिपुरा विधानसभा निवडणूक निकाल: डाव्यांच्या गडाला धक्का, कमळ फुलले title=

अगरताळा: त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत डाव्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. गेली २५ वर्षे सत्ता कायम ठेवणाऱ्या डव्यांना पहिल्यांदाच तडाखा बसला असून, आतापर्यंत एकही जागा नसलेल्या भाजपने बुहमताचा आकडा पार करत सत्तेचे कमळ फुलवले आहे. 

सरकार स्थापन करण्यासाठी ३१ हा बहुमताचा आकडा

प्राप्त माहितीनुसार, त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या एकूण ५९ जागांपैकी भाजप ३२ तर, डव्यांना केवळ २६ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर, एका ठिकाणी अन्य पक्षाच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे. ६० जागांच्या विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी ३१ हा बहुमताचा जादूई आकडा असणार आहे. 

त्रिपुरामध्ये गेली २५ वर्षे सीपीएमची सत्ता

गेली २५ वर्षे सीपीएमची सत्ता त्रिपुरामध्ये आहे. भाजपने जोरदार धक्का दिल्याने डाव्यांचा गड पूर्णपणे उद्ध्वस्थ झाला आहे. त्यामुळे गेली २५ वर्षे सत्तवेर असलेल्या डाव्यांना सत्तेबाहेर जावे लागणार आहे. त्रिपुराचे सीपीएमचे मुख्यमंत्री माणिक सरकार मात्र आपल्या धनपुर मतदारसंघातून १८८२ मतांनी आघाडीवर आहेत.