Ajab Gajab News : सोशल मीडियावर (social media) रोज अनेक व्हिडीओ व्हायरल (viral video) होत असतात. आता देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हत्तीच्या (elephant) शक्तीची कल्पना येईल. साधा प्राणी समजला जाणारा हत्ती धोकादायक वाघावरही (tiger) आपलं वर्चस्व गाजवू शकतो. असं या व्हिडीओमधून दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये एक वाघ शिकारीसाठी हत्तीचा पाठलाग करतो. पण हत्तीच्या लक्षात येतात तो संपूर्ण खेळ बदलून टाकतो.
व्हायरल व्हिडीओमध्ये वाघाने जंगलातील झाडाझुडपांमध्ये आणि गवतामध्ये लपलेल्या हत्तीला लक्ष्य केल्याचं दिसत आहे. वाघ हत्तीच्या मागे धावतो... मग तो हत्तीच्या जवळ जातो. हत्तीला याची जाणीव होते. त्यामुळे हत्तीही सावध होतो.
अचानक वाघ हत्तीवर हल्ला करतो. पण हत्ती काही सेकंदात सगळा खेळ उलटवून टाकतो. हत्ती मागे वळतो आणि वाघावरच हल्ला करतो. यानंतर वाघाला आपली शिकार विसरून पळ काढावा लागतो. पाहा व्हिडीओ...
Tiger can scare but cannot kill a full grown elephant@susantananda3 pic.twitter.com/1kWConQUeK
— Santosh Sagar (@santoshsaagr) October 11, 2022
सध्या हत्ती आणि वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र दोघांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ 47 सेकंदांचा आहे. हा व्हिडिओ संतोष सागर नावाच्या युजरने शेअर केला आहे.
संतोष सागरने व्हिडिओमध्ये IFS अधिकारी सुशांत नंदा यांनाही टॅग केलं आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'वाघ घाबरवू शकतो पण हत्तीला मारू शकत नाही.'
ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत 10 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, त्याला 300 हून अधिक लोकांनी लाइक केले आहे.