जेव्हा घरात हत्ती शिरतो...

फक्त मानवच प्राण्यांच्या निवासस्थानांवर अतिक्रमण करत नाही तर आता चक्क प्राणी देखील आपल्या निवासावर अतिक्रमण करत असल्याचे दिसून येत आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 5, 2017, 10:25 AM IST
जेव्हा घरात हत्ती शिरतो... title=

तमिळनाडू : फक्त मानवच प्राण्यांच्या निवासस्थानांवर अतिक्रमण करत नाही तर आता चक्क प्राणी देखील आपल्या निवासावर अतिक्रमण करत असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना तमिळनाडू येथील कोईम्बतूर येथे घडली.

घरात हत्ती शिरला...

कोईम्बतूर येथील एका घरात चक्क हत्ती शिरला. हा विचारच आपली घाबरगुंडी उडवतो. पण आश्यर्याची गोष्ट ही की, अन्नाच्या शोधात घरात शिरलेल्या हत्तीने घराचे काहीही नुकसान न करता अन्न न मिळाल्याने तो तिथून निघुन गेला.

हत्तीची करामत

ही आश्यर्यकारक घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. एएनआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये हत्ती आणि पील्लू दोघेही घराच्या बाहेरील शेडमधून घरात जाताना दिसतात. त्यांना घरात खाण्यासाठी काहीच मिळत नाही. काहीवेळ तेथे रेंगाळत दोघेही अतिशय शांतपणे तेथून निघून जातात. 

व्हिडिओ व्हायरल

हत्तीसारख्या शक्तीशाली, बलाढ्य प्राण्याची ही शांत, सभ्य वर्तवणुक प्राण्यांमधील सामंजस्य दर्शवते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.