बारामुल्लात झालेल्या चकमकीत लष्कराचे एक अधिकारी जखमी

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला भागात झालेल्या चकमकीत लष्कराचे एक अधिकारी जखमी झालेत. 

Updated: Sep 4, 2020, 10:01 AM IST
बारामुल्लात झालेल्या चकमकीत लष्कराचे एक अधिकारी जखमी title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला भागात झालेल्या चकमकीत लष्कराचे एक अधिकारी जखमी झालेत. पट्टण भागात येड्डीपुरा भागात पोलीस आणि लष्कराची शोधमोहीम सुरू होती. त्या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने चकमक सुरु झाली. या चकमकीत आर्मीचे एक अधिकारी गोळीबारात जखमी झालेत. त्यांच्यावर ९२ बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. चकमक अजूनही सुरूच आहे. अतिरिक्त कुमक या भागात पाठवण्यात आली आहे. 

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टण भागातील येड्डीपुरा गावात सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात चकमकीस प्रारंभ झाला आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर घेरला आहे. चकमकीच्या वेळी सैन्यातील एक अधिकारी जखमी झाले आहेत. काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्टिट करून माहिती दिली आहे. बारामुल्लातील पट्टण भागातील येड्डीपुरा येथे चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल शोधमोहीम घेत आहेत. पुढील माहिती नंतर दिली जाईल.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, येड्डीपुरामध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. मध्यरात्री पोलीस, २९ आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम राबविली. ज्यावेळी दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला घेराब घातला त्यावेळी गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा घेराबंदीनंतर दोन ते तीन दहशतवादी जाळ्यात अडकले आहेत. दरम्यान, ही कारवाई संपल्यानंतरच अतिरेक्यांची नेमकी संख्या कळू शकेल.