EPFO Latest News: तुमचा PPO नंबर हरवला तर तुमची पेन्शन थांबू शकते. अशावेळी तुम्ही अडचणीत येऊ शकता. कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांना (Pensioners) पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नावाचा एक महत्वाचा क्रमांक दिला जातो. या आधारे पेन्शनधारकांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते. जरी आपण तो हरवला तरी पुन्हा सहजपणे मिळवू शकता.
पीपीओ क्रमांक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाद्वारे (EPFO) कोणत्याही कंपनीतून निवृत्त होणाऱ्या व्यक्तीला जारी केला जातो. याशिवाय पेन्शन मिळू शकत नाही. म्हणूनच तो असणे खूप महत्वाचा आहे. खरं तर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लाभार्थीच्या ओळखीसाठी दिलेल्या PPO क्रमांकावरून पगाराची स्थिती इत्यादी तपासण्याची सुविधा देखील प्रदान करते. जाणून घ्या हा क्रमांक परत मिळवण्याची प्रक्रिया.
1. सर्वप्रथम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा .
2. आता 'ऑनलाइन सेवा' विभागात, ‘Pensioners Portal’ या पर्यायावर क्लिक करा.
3. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्ही 'Know Your PPO No' वर क्लिक करा.
4. येथे तुम्ही तुमचा बँक खाते क्रमांक भरा. ज्यामध्ये तुमचे पेन्शन दर महिन्याला येते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचा PF नंबर टाकूनही शोधू शकता.
5. सर्व तपशील भरल्यानंतर ते सबमिट करा.
6. यानंतर तुम्हाला तुमचा PPO नंबर स्क्रीनवर दिसेल.
- 12-अंकी हा विशेष क्रमांक तुमच्यासाठी संदर्भ म्हणून काम करतो.
- याद्वारे केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाशी संपर्क साधला जातो.
- पेन्शनधारकांच्या पासबुकमध्ये पीपीओ क्रमांक टाकून तुमचे खाते एका बँकेतून दुसऱ्या नशाखेत हस्तांतरित करणे देखील सोपे आहे.
- पेन्शनशी संबंधित कोणत्याही कामासाठी किंवा तक्रारीसाठी EPFO मध्ये PPO क्रमांक देणे बंधनकारक आहे.
नपेन्शनची स्थिती पाहण्यासाठी देखील हा क्रमांक लिहिणे खूप महत्वाचे आहे.