मुंबई : जर तुम्ही नोकरी करीत असाल तर, तुमचे ईपीएफ अकाऊंट (EPF ACCOUNT)असेलच. तुम्हाला तुमच्या EPF अकाऊंटशी संबधीत कोणतेही काम कधी ना कधी तर करावेच लागते. अनेकदा तुम्हाला EPFO कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. परंतु ईपीएफओच्या उमंग ऍपमुळे तुम्ही अनेक सेवा घरबसल्या मिळवू शकता.
उमंग ऍपवर कर्मचाऱ्यांशी संबधित सुविधा (umang app epfo)
हे ऍप कर्मचाऱ्यांशी संबधित कामासाठी सेवा प्रदान करते. कोणीही कर्मचारी या ऍपच्या माध्यमातून आपल्या ईपीएफ अकाऊंटचा पासबुक पाहू शकतो. क्लेम करू शकतो. क्लेम ट्र्क करू शकतो. युएएनला ऍक्टिवर करू शकतो. कोविड 19 संबधित क्लेम करू शकतो. फॉर्म 10 सी मिळवू शकतो.
Avail services of #EPFO on #UMANG App - the only official App of EPFO.#EPF #SocialSecurity #ईपीएफ #employees #services pic.twitter.com/KHpH8qFxdY
— EPFO (@socialepfo) October 8, 2021
साधारण सेवांचे मिळणार फायदे
कर्मचारी आपल्या कामकाजासाठी या ऍपच्या माध्यमातून ईपीएफओ कार्यालये शोधू शकतात. सोबतच एसएमसएस आणि मिस्ड कॉलवरून अकाऊंट डिटेल्स मिळवू शकतात. तसेच रेमिटंन्स डिटेल्स मिळवू शकतात.
पेंशनशी संबधित सेवा
उमंग ऍपच्या माध्यमातून पेंशनर गरजेच्या सेवा मिळवू शकतात. या माध्यमातून पासबुक तपासू शकता. जीवन प्रमाण सर्टिफिकेट सबमिट करू शकतात. सोबतच पेंशन पेमेंट ऑर्डर डाऊनलोड करू शकतात. उमंग ऍपच्या माध्यमातून आधार बेस्ड केवायसीची सुविधा देखील प्राप्त करू शकतात.