भाजप आमदाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम मशीन; निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

भाजप आमदाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ

Updated: Apr 2, 2021, 02:42 PM IST
भाजप आमदाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम मशीन; निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल title=

गुवाहाटी : आसाममधील भाजप आमदाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने अहवाल मागितला आहे.

निवडणूक आयोगाला मिळालेल्या माहितीनुसार, मतदान केंद्र अधिकारी/ कर्मचाऱ्यांची कार नादुरूस्त झाल्याने त्यांनी अधिकाऱ्याने भाजप आमदाराला लिफ्ट मागितली. त्यांनीही कर्मचाऱ्यांना लिफ्ट दिली. 

भाजप नेत्याची गाडी होती याची कल्पना नव्हती

निवडणूक आयोगाला जिल्हा निवडणूक अधिकारीकडून मिळालेल्या प्राथमिक रिपोर्टच्या आधारे, मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना नव्हती की, ज्या गाडीत ते लिफ्ट घेत आहेत. ती भाजप आमदाराची गाडी आहे. संबधित गाडीची भाजप आमदाराच्या नावावर नोंद आहे.

ईव्हीएम सीलबंदच

 लिफ्ट घेऊन मतदान केंद्र कर्मचारी भाजप आमदाराच्या कारमधून निघत असताना, स्थानिक लोकांनी कार थांबवली. त्यांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. यावेळी उपस्थितांनी संताप व्यक्त केला. संबधित कारमध्ये ईव्हीएम मशीनही होते. खरेतर त्यावेळी ईव्हीएम सीलबंदच होते.
 
 याप्रकरणी निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. कॉग्रेसने याप्रकरणी कडाडून टीका केली आहे. कॉग्रेसनेत्या प्रियंका गांधी यांनीही याप्रकरणी ट्वीट केले आहे.