मुंबई : बहुतेक लग्नात किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या निधनानंतर आपल्याकडे हवेत गोळीबार केला जातो. त्याच बरोबर अनेक वेळा पोलीस एरियल फायरिंग करतात तर, कधी लोक त्यांचा छंद म्हणून एरियल फायरिंग करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, बंदुकीतून गोळी झाडली जाते, तेव्हा ती कुठे जाते आणि यामुळे कोणाला इजा नसेल का? जेव्हा गोळीबार केला जातो, तेव्हा बंदुकीतून गोळी बाहेर पडते, तेव्हा त्यामागील शेल किंवा कव्हर बाहेर येऊन बंदुकीजवळ खाली पडते आणि गोळी सगळ निघून टार्गेटवर आदळते. जर टार्गेट एका व्यक्तीला केलं, तर ते त्याच्या शरीरात प्रवेश करते. हे तर आपल्याला माहित आहे. पण, मग हवाते गोळी मारल्यावर काय होते?
बंदुकीतून निघणाऱ्या गोळीला काडतूस म्हणतात. काडतुसाच्या मागील भागाला प्राइमर कंपाऊंड म्हणतात, जे गोळीबाराच्या वेळी गनपावडरचा स्फोट करते. गोळीबार करत असताना बंदुकीतून काडतुसाचा कवच बाहेर येतो आणि तिथेच पडतो आणि बंदुकीतून गोळी बाहेर येते.
हवेत गोळीबार करताना गोळी खूप अंतर पार करते आणि गुरुत्वाकर्षणाच्या जोरामुळे ती परत जमिनीवर येते. ती नुसती आकाशात नाहीशी होते असे नाही. हवेतील बुलेटचा प्रवास हा वाऱ्याचा वेग आणि बंदुकीच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो.
ठराविक अंतर कापल्यानंतर बुलेट पुन्हा जमिनीवर येते, पण येताना तिचा वेग खूपच कमी राहतो. त्यामुळे गोळी जरी खाली आली, तरीही कोणतीही इजा करत नाही.
असे असेल तरी हवेत गोळाबार करणे हे फार रिस्की आहे. कारण हवेत गोळीबार करताना जर एखाद्या गोष्टीवर गोळी आदळली, तर ती पुन्ही रिव्हर्स येऊ शकते. अशा घटनेमुळे अनेकांचे प्राण देखील गेले आहे.