Chinse Incense Sticks : तुम्ही चायनीज अगरबत्ती वापरत असाल तर ही बातमी पाहा. चायनीज अगरबत्तीच्या धुरामुळं कॅन्सर, श्वसनाचे आजार होतात असा दावा करण्यात आलाय. त्यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. हा दावा कितपत खरा आहे. अगरबत्तीच्या धुरामुळे श्वसनाचे आजार होतात का? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol chinse incense sticks effecte health or not know what true what false)
चायनीज अगरबत्त्यांचा धूर आरोग्यास हानिकारक असल्याचा दावा करण्यात आलाय. देवपूजेसाठी घरात आणि मंदिरात अगरबत्त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यांचा सुगंध अगदी मनसोक्त घेणारेही अनेकजण असतात. पण, चायनीज अगरबत्ती धूर, तिची विभूती आरोग्यास हानिकारक असल्याचा दावा केल्यानं लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय.
ऐन गणेशोत्सवात हा मेसेज व्हायरल झाल्यानं चायनीज अगरबत्ती नक्की ओळखायची तरी कशी हाच प्रश्न लोकांना पडलाय...पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहा.
सुवासिक,गोल्डन किंवा सिल्व्हर कलरच्या अगरबत्या घातक आहेत. मंदिरामध्ये गेल्यानंतर विभूती कपाळाला लावल्यानंतर तेच बोट जिभेवर टेकवतो.अत्यंत घातक केमिकल्स आपल्या पोटात जाऊन भयंकर आजार होऊ शकतात.
हा मेसेज पाहून सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झालीय...पूजा करताना अगरबत्ती, धूप पेटवल्याशिवाय पूजा पूर्णच होत नाही. आता हा दावा ऐकून सगळ्यांचीच झोप उडालीय. पण, हे कितपत खरं आहे. हा दावा खरा आहे का याची सत्यता पडताळून पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं आमच्या प्रेक्षकांना याचं सत्य सांगण्यासाठी आमच्या व्हायरल पोलखोल टीमनं पडताळणी केली.
नेमकी अगरबत्ती बनवताना त्यामध्ये कोणतं मिश्रण वापरलं जातं. चायनीज अगरबत्ती कशी ओळखावी. याची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहुयात.
हॅन्डमेड अगरबत्ती वनस्पतीपासून तयार केली जाते. चायनीज अगरबत्ती केमिकल वापरून तयार करतात. चायनीज अगरबत्ती स्वस्त असल्यानं ग्राहकाला परवडते. चायनीज अगरबत्तीमुळं फुफ्फुसाचे आजार उद्धभवू शकतात.
त्यामुळं स्वस्त आणि जास्त अशा अगरबत्ती तुम्ही घेत असाल तर सावधगिरी बाळगा. आमच्या पडताळणीत चायनीज अगरबत्तीचा धूर आणि विभूती आरोग्यास हानिकारक असल्याचा दावा सत्य ठरला.