Viral Video : देवाजवळ दिवा लावताना महिला भाजली

या महिलेनं तोंडाला मास्क लावलाय आणि हातात दोन दिवे घेऊन दर्शनासाठी रांगेत उभी आहे.   

Updated: Oct 21, 2022, 11:36 PM IST
Viral Video : देवाजवळ दिवा लावताना महिला भाजली title=

Viral Video : तुम्ही जर देवासमोर दिवा लावत असाल तर ही बातमी पाहा. एक महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. देवाचं दर्शन घेतलं. पण देवासमोर दिवा लावताना ती गंभीर जखमी झाली. असं काय घडलं महिलेसोबत. चला पाहूयात.  या व्हिडिओमध्ये पाहा.मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. देवाला हार फुले तेल चढवून भाविक दर्शन घेत आहेत. याच वेळी येथे एक गंभीर प्रकार घडला. हा व्हिडिओ नीट पहा. (fact check viral polkhol woman injured while lighting a lamp in front of god)

या महिलेनं तोंडाला मास्क लावलाय आणि हातात दोन दिवे घेऊन दर्शनासाठी रांगेत उभी आहे. हातातील दिव्यांनी देवाला ओवाळल्यानंतर हे दिवे ठेवण्यासाठी ही महिला देवासमोर नतमस्तक झाली. उजव्या हातातला दिवा देवाजवळ ठेवत असतानाच डाव्या हातातील दिवा या महिलेच्या केसांना लागला. आणि बघता बघता या महिलेचे केस पेटले. महिलेच्या दोन्ही हातात दिवे असल्याने तिला पेटलेले केस विझवणंही अवघड झालं.  केस पेटलेले असतानाच हातात दोन्ही दिवे घेऊन ही महिला इकडे तिकडे पळू लागली. 

महिला आरडाओरड करत असल्याने सगळेजण तिच्या बाजूने धावलं. लोकांनी हातातील दिवे फेकून देण्यास सांगितले त्यावेळी या महिलेनं दोन्ही दिवे फेकले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका महिला प्लेटमधून पाणी घेऊन आली. आणि  या महिलेच्या केसांना लावून आग विझवली. पण तोपर्यंत ही महिला गंभीर जखमी झाली. हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून दिवे पेटवताना महिलांनी काळजी घ्यायला हवी.