हुंडा हत्येप्रकरणी कुटुंबाला आजीवन कारावासाची शिक्षा...

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हात हुंडाबळीप्रकरणी एका कुटुंबाला आजीवन कारावास देण्याची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 2, 2017, 02:42 PM IST
हुंडा हत्येप्रकरणी कुटुंबाला आजीवन कारावासाची शिक्षा... title=

बलिया : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हात हुंडाबळीप्रकरणी एका कुटुंबाला आजीवन कारावास देण्याची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. चार वर्षापुर्वी घडलेल्या या घटनेत पती, सासू व नणंद दोषी ठरले असून त्यांना १५-१५ हजार रुपये दंड आणि आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. 

गुन्हा दाखल

अभियोजन पक्ष के अधिवक्ता त्रिभुवन यादव यांनी सांगितले की, नगरा ठाणे भागात असलेल्या देवरिया गावात राहत असलेल्या नीतू यादव (२०) या विवाहीतेची हुंड्यासाठी २४ मार्च २०१३ ला जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती. 
याप्रकरणी विवाहीतेचा पती अश्वनी, सासू सुमित्रा आणि नणंद मीरा विरुद्ध भारतीय दण्ड विधानाच्या हुंडाबळी व शव गायब करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अखेर न्याय मिळाला

अपर जिल्हाचे न्यायाधीश विनोद कुमार यांनी दोन्हीकडची बाजू ऐकून घेऊन तिन्ही आरोपींना दोषी ठरवले. त्याचबरोबर त्यांना आर्थिक दंड आणि आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली.