वाहनचालकांनो, 31 मार्चआधी करा हे काम; अन्यथा भरावा लागेल दंड

Fastag KYC Update: ग्राहकांनी आरबीआयच्या नियमानुसार फास्टॅगची प्रक्रिया पूर्ण करावी, तरच तुम्हाला फास्टॅगची अविरत सेवा मिळणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Mar 24, 2024, 10:36 AM IST
वाहनचालकांनो, 31 मार्चआधी करा हे काम; अन्यथा भरावा लागेल दंड  title=
Fastag KYC Update

Fastag KYC Update: वाहनचालकांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. तुम्ही तुमच्या कारचा फास्टॅग बॅंकेतून केवायसी अपडेट केला नसेल तर आजच करा. कारण 31 मार्चनंतर केवायसी नसलेले फास्टॅग डिअ‍ॅक्टीव्ह किंवा ब्लॅकलिस्टेड करण्यात येणार आहेत. यानंतर फास्टॅगमध्ये बॅलेन्स असला तरी तुम्हाला पेमेंट करता येणार नाही. ग्राहकांनी आरबीआयच्या नियमानुसार फास्टॅगची प्रक्रिया पूर्ण करावी, तरच तुम्हाला फास्टॅगची अविरत सेवा मिळेल, असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत.

एका गाडीत एक फास्टॅग 

ग्राहकांना एका गाडीमध्ये केवळ एक फास्टॅग वापरता येणार आहे. एनएचएआयने दिलेल्या निर्देशानुसार, 'एक वाहन-एक फास्टॅग' नितीचे पालन करावे लागेल. आधी जाहीर करण्यात आलेले सर्व फास्टॅग संबंधित बॅंकाना परत करावे लागणार आहेत. आता केवळ नवे फास्टॅग अ‍ॅक्टीव्ह राहणार आहेत.

एक वाहन एक फास्टॅग अभियान 

फास्टॅगमधून टोल वसूल करतानादेखील टोल प्लाझालावरील रांगा लागतात. या कमी व्हाव्यात आणि यात पारदर्शकता यावी यासाठी एक वाहन एक फास्टॅग अभियान सुरु करण्यात आले आहे. एनएचएआयने आधी एका गाडीसाठी अनेक फास्टॅग जारी करत आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले होते.तसेच विना केवायसी फास्टॅग जारी केल्याचे एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे. 

कॅशने व्यवहार करताय? ... तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस 

काय आहे फास्टॅग? 

फास्टॅग एक प्रकारचा स्टिकर आहे. हा स्टिकर वाहनाच्या विंडस्क्रिनवर लावलेला असतो. फास्टॅग रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन किंवा आरएफआयडी तंत्रज्ञानावर काम करते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टोल प्लाझावर लागलेल्या कॅमरा स्टिकरचा बारकोड स्कॅन केला जातो. यानंतर टोल शुल्क आपोआप फास्टॅगच्या वॉलेटमधून कट होते.

फास्टॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांना टोल टॅक्स भरण्यासाठी जास्तवेळ थांबावे लागत नाही. टोल प्लाझावर लागणारा वेळ आणि प्रवासाचा वेळ वाचण्यासाठी फास्टॅगचा उपयोग चांगला ठरतो.

केरळच्या 4 ठिकाणी फिरा तुमच्या बजेटमध्ये, IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज 

पेट्रोल गाडी विसरा, 'अशी' वाढेल इलेक्ट्रीक कारची बॅटरी लाइफ