मुंबई : केंद्र सरकार वेळोवेळी अनेक स्पर्धा आयोजित करत असते, ज्यामध्ये विजेत्या सहभागींना अनेक रोख बक्षिसे देखील दिली जातात. यावेळी अर्थ मंत्रालयाने एक स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेत सहभागींना विकास वित्तीय संस्थेचा लोगो, नाव आणि टॅगलाइन सुचवावी लागेल. जर तुमचे कोणतेही नाव, लोगो किंवा टॅगलाईन सरकारने निवडले असेल तर तुम्हाला 5 प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
परंतु या स्पर्धेत कोण अर्ज करू शकतो आणि स्पर्धा जिंकण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल. तसेच, आपण कसे अर्ज करू शकता आणि पुरस्कारासंदर्भात काय नियम आहेत? आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहोत.
या स्पर्धेत तीन श्रेणी आहेत, ज्यात नाव, टॅगलाईन आणि लोगो यांचा समावेश आहे. या तीन प्रकारातील पहिल्या 3 विजेत्यांना बक्षिसे दिली जातील. यामध्ये विजेत्याला 5 लाख रुपये, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला 3 लाख आणि 2 लाख रुपये अनुक्रमे दिले जातील.
म्हणजेच या स्पर्धेत एकूण 9 विजेते निवडले जातील, ज्यात तीन श्रेणीतल्या विजेत्यांना 5-5 लाख रुपये, तर दुसऱ्या क्रमांकाच्या तीन उपविजेत्यांना 3-3 लाख आणि तिसऱ्या तीन उपविजेत्यांना 2-2 लाख रुपये दिले जातील.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पात विकास वित्तीय संस्थेची घोषणा केली होती आणि आता सरकारने ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. DFI इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पासाठी स्वतंत्रपणे निधी देईल आणि लवकरच अनेक प्रकल्पांना त्याद्वारे निधी दिला जाईल आणि नवीन प्रकल्प विकसित केले जातील. म्हणजेच सरकार या पायाभूत प्रकल्पांवर 11 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.
आता तुम्हाला हे तर समजले आहे की, DFI नक्की काय काम करेल, म्हणून त्याच्या कार्याप्रमाणे तुमचा लोगो, नाव आणि टॅगलाईन असली पाहिजे. तसेच यासगळ्यामध्ये DFIचे काम प्रतिबिंबित झाले पाहिजे. याशिवाय या तीन गोष्टींमध्ये नवीन भारत म्हणजेच न्यू इंडिया देखील दिसला पाहिजे.
जर तुम्ही या स्पर्धेत तुमची एंट्री पाठवत असाल, तर तुम्हाला याची काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही पाठवत असलेल्या गोष्टी कुठूनही कॉपी होऊ नये आणि प्रत्येक नावाच्या टॅगलाईनला काही अर्थ असावा. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
या स्पर्धेत तुम्ही 15 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकता.
जर तुम्हाला स्पर्धेत अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला सरकारच्या MyGov वेबसाइटवर नोंदणी करून अर्ज करावा लागेल. या व्यतिरिक्त, आपण https://static.mygov.in/rest/s3fs-public/mygov_162737759951553221.pdf या लिंकवर क्लिक करून नियम आणि अटींबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.