अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका इमारतीला आग लागली आहे. जगतपूर-गोटा भागात ही इमारत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या माळ्यावर ही आग लागली आहे. आतापर्यंत या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. आगीत जवळपास ३० लोकं फसले होते. त्यापैकी काही जणांना अग्निशमनदलाने लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. आगीचं कारण अजून समोर आलेली नाही. शॉर्टसर्किटमुळे किंवा गॅस सिलेंडर लीक झाल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पायऱ्यांच्या ठिकाणी देखील आग लागली असल्यामुळे वरचे लोकं अडकले आहेत.
Gujarat: Fire breaks out in an apartment building in Ahmedabad. Rajesh Bhatt, Fire Officer says, "Fire broke out on 5th-6th floor of the building. All people have been safely rescued, 2 were in serious condition, their status will be updated by the hospital." pic.twitter.com/k6kDXDv0PI
— ANI (@ANI) July 26, 2019
मोठ्या-मोठ्या इमारतींमध्ये आगीचं प्रमाण वाढलं आहे. सोयी-सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हलगर्जीपणा करण्यात येतो.