Bank Privatisation: आठवड्याभरात Private होणार 'ही' बँक; तुमचं इथे खातं आहे का?

Bank Privatisation: वर्षाची सुरुवात होत नाही, तोच बँकांसंदर्भातील मोठ्या बातम्यांनी वळवल्या ठेवीदारांच्या नजरा. याचा तुमच्यावर किती परिणाम होणार? पाहा... 

Updated: Jan 2, 2023, 11:04 AM IST
Bank Privatisation: आठवड्याभरात Private होणार 'ही' बँक; तुमचं इथे खातं आहे का?  title=
FM Nirmala Sitharaman on idbi Bank Privatisation read details

Bank Privatisation: गेल्या काही दिवसांपासून बँकिंग क्षेत्राशी संबंधित बरेच मोठे निर्णय घेतले जात आहेत. या निर्णयांपैकीच एक म्हणजे बँकांच्या खासगीकरणाचा. सध्याच्या घडीला बँकांच्या खासगीकरणाशी संबंधीत एक नवी माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये आणखी एक बँक (IDBI Bank) सरकारकडून खासगी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी दिली. 

आठवड्याभरात Private होणार बँक 

सध्या सरकारकडून काही बँकांमध्ये असणारी भागिदारी विकण्यात येत आहे. यातच आता IDBI Bank सुद्धा Privatisation च्या यादीत आली आहे. 7 जानेवारीपर्यंत, म्हणजेच आठवड्याभराहूनही कमी वेळात ही बँक पूर्णपणे खासगी करण्यात येणार आहे. 

बोली लावण्याची मुदत वाढवली 

सरकारतर्फे IDBI Bank बँकेसाठी प्रारंभिक तत्त्वावर बोली लावण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. ही मुदत आता 7 जानेवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र शासन आणि LIC आयडीबीआय बँकेत असणारी त्यांनी 60.72 टक्के भागीदारी विकू इच्छितात. त्यामुळं ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलात यासाठी इच्छुक खरेदीदीरांनी बोली लावण्याचं आवाहन बँकेकडून करण्यात आलं होतं. 

हेसुद्धा वाचा : Weather Update : पर्यटनासाठी जानेवारी उत्तम; देशातील 'या' भागात तापमान उणे 2 अंशांहूनही कमी 

कोण खरेदी करु शकतं ही भागिदारी? 
समोर आलेल्या माहितीनुसार या बँकेची भागिदारी खरेदी करण्यासाठी कार्लाइल ग्रुप, फेअरफॅक्स फायनॅन्शियल होल्डिंग्ज आणि DCB Bank यांनी रस दाखवला आहे. दरम्यान बँकेच्या खासगीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये शेअर बाजारातही बँकेच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. प्राथमिक अंदाजानुसार या बँका IDBI Bank मध्ये 10 टक्के भागिदारीसाठी बोली लावू शकतात. 

फक्त आयडीबीआयच नव्हे, तर सरकारकडून खाजगीकरणासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओवरसीज बँक यांची नावंही पुढे आल्याची बाब समोर आली होती. इंडियन ओवरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं खाजगीकरण होऊ शकतं.