Ration Card Benefits : रेशन कार्ड हे आपल्याला ठिकठिकाणी उपयोगात पडतं. यामुळे मोफत किंवा कमी किंमतीमध्ये रेशन तर मिळतंच पण त्याचबरोबर याच रेशन कार्डचा वापर सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी होतो तर काही वेळा हेच रेशन कार्ड आपण ओळख प्रमाणपत्र (Identity Certificate) म्हणून देखील वापरु शकतो.
Ration Card Name List : आर्थिकदृष्ट्या कमकूवत नागरिकांसाठी सरकार कडून रेशन कार्ड (Ration Card) दिलं जातं. सरकार, रेशन कार्डच्या माध्यमातून मोफत किंवा कमी दरात (Free Ration) धान्य देतं. रेशन कार्डमुळे मिळणाऱ्या धान्यामुळे लाखो कुटूंबांचा उदरनिर्वाह होतो. असं असलं तरी, रेशन कार्ड संबंधीची माहिती मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. पण मुळात ही प्रक्रिया खुप सोपी आहे.
अशी मिळवा रेशन कार्डची माहिती :-
स्टेप 1 - रेशन कार्ड चेक करण्याची mahafood.gov.in या राज्यशासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
स्टेप 2 - महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यावर उजव्या बाजूला ऑनलाइन सर्व्हिसेस पर्याय निवडा. तिथे सर्वात आधी पहिल्या ऑप्शनवर ऑनलाइन फेअर प्राइस शॉप्स आणि मराठीतील ऑनलाइन रेशन दुकानला सिलेक्ट करा.
स्टेप 3 - यानंतर एक नवीन विंडो सुरू होईल. तिथे AePDS-All Districts चा पर्याय असेल. त्यानंतर AePDS मधील सर्व जिल्ह्यांच्या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 4 - आता पुन्हा एक नवीन वेब पोर्टल ओपन होईल. तिथे डाव्या बाजूस रिपोर्ट सेक्शन मिळेल. याच्या खाली RC Details हा पर्याय असेल. रेशन कार्ड लिस्टमध्ये नाव पाहण्यासाठी या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 5 - यानंतर स्क्रीनवर तुम्हाला SRC Number विचारला जाईल. RC Details चेक करण्यासाठी SRC Number भरून सब्मिट करा.
स्टेप 6 - SRC नंबर भरून सब्मिट केल्याबरोबर, रेशन कार्ड डिटेल्स स्क्रीनवर येतील. यामध्ये Member Details, Entitlement for RC आणि Transaction Details for RC चेक करता येतील.