काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी राहुल गांधींच्या PA ला अटक, महात्मा गांधींचा अपमान केल्याचा आरोप

24 जून रोजी वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती

Updated: Aug 19, 2022, 09:55 PM IST
काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी राहुल गांधींच्या PA ला अटक, महात्मा गांधींचा अपमान केल्याचा आरोप title=

केरळमधील (Kerala) वायनाड (Wayanand) येथे काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी काँग्रेसच्याच चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुल गांधी यांचे स्वीय सचिव रितिश कुमार यांनाही अटक केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा अपमान केल्याचा आरोप करत पोलिसांनी रितिश कुमारसह चार जणांना अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

24 जून रोजी वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. त्यावेळी सीपीएमच्या विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांनी राहुल गांधी यांच्या कार्यालयाचा घेराव  घातला होता.राहुल गांधी खासदार होऊनही वायनाड लोकसभा मतदारसंघाची विकासकामे योग्य पद्धतीने करू शकत नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळेच हे आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर सीपीएम विद्यार्थी संघटना एसएफआयच्या सदस्यांनी राहुल गांधी यांच्या वायनाड कार्यालयाची तोडफोड केल्याची माहिती समोर आली होती. या हाणामारीत महात्मा गांधींचा फोटो कार्यालयाच्या फरशीवर पडले.

कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या घटनेबाबत काँग्रेसने एसएफआयवर आरोप केला होता की त्यांनी महात्मा गांधींच्या चित्राची हानी केली आहे. त्याचबरोबर सीपीएमने काँग्रेस कार्यकर्त्यांबाबत हाच आरोप केला. आता या घटनेच्या सुमारे दोन महिन्यांनंतर स्थानिक पोलिसांनी काँग्रेस पक्षाच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

 

राहुल गांधींच्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या घटनेबाबत, राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी 2 जुलै रोजी विधानसभेत सांगितले होते की, घटनेनंतर कार्यालयात घुसलेल्या सर्व एसएफआय कार्यकर्त्यांना घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हटवले होते. दरम्यान, एका पोलिसांच्या फोटोग्राफरने घटनास्थळाचा फोटो काढला असता, महात्मा गांधींचा फोटो भिंतीवर टांगलेले होता.

 

घटनेच्या वेळी महात्मा गांधींचा फोटो भिंतीवर

एसएफआय कार्यकर्त्यांना तेथून हटवल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते कार्यालयात होते असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नंतर पोलिसांच्या फोटोग्राफरने पुन्हा घटनास्थळाचा फोटो काढला तेव्हा महात्मा गांधींचा फोटो खराब अवस्थेत जमिनीवर पडलेला होता, असे त्यांनी सांगितले. आपल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या फोटोग्राफरने दिलेल्या जबाबाचा संदर्भ दिला.